शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी काढलेला अन्यायकारक जीआर रद्द करा

By admin | Updated: November 20, 2015 02:08 IST

सामान्य प्रशासन विभागाकडून २१ आॅक्टोबर रोजी काढण्यात आलेले परिपत्रक आदिवासी जनतेसाठी अन्यायकारक आहे.

सरकारविरुद्ध आंदोलन : विधानसभा आदिवासी आमदार मंचाची मुख्यमंत्र्यांकडे मागणीदेवरी : सामान्य प्रशासन विभागाकडून २१ आॅक्टोबर रोजी काढण्यात आलेले परिपत्रक आदिवासी जनतेसाठी अन्यायकारक आहे. हा जीआर रद्द करुन अवैध अनुसूचित जमाती प्रमाणपत्रांच्या आधारे नियुक्त कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देण्याची मागणी करीत आदिवासी आमदार मंचाचे अध्यक्ष प्रा. राजू तोडसाम, सचिव आ. संजय पुराम, खा.अशोक नेते, आ. देवराव होळी, आ.कृष्णा गजबे यांनी १७ नोव्हेंबर रोजी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले. तसेच या गंभीर विषयावर चर्चा केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ५ डिसेंबरपर्यंत तोडगा काढून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.सर्व आदिवासी आमदारांनी निवेदनात मागणी करताना म्हटले की, १५ जून १९९५ पूर्वी व त्यानंतर १७ आॅक्टोबर २००१ पर्यंत अवैध अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रांच्या आधारे शासन सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक काढल्यामुळे लाखो वैध अनुसूचित जमातींच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाले. याबाबत आदिवासी सामाजिक संघटनेकडून आपल्या प्रशासनाकडे तसेच आदिवासी आमदारांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहे. सन १९९५ पूर्वी वैध अनुसूचित जमाती संवर्गातील राखीव पदावर अवैध अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र धारकांनी नोकऱ्या बळकाविल्या. त्यामुळे लाखो वैध अनुसूचित जमातीच्या लाखो कर्मचाऱ्यांवर तसेच सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होत आहे. यासाठी आज तारखेपासून अनुसूचित जमातीचे वैध प्रमाणपत्र असल्याखेरीज कोणत्याही उमेदवारास नियुक्ती देण्यात येवू नये.तसेच सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राखेरीज बढती देण्यात येवू नये. सन १९९५ पूर्वीपासून रिक्त अनुसूचित जमाती संवर्गातील सर्व पदे विनाशर्त विशेष बाब म्हणून तात्काळ भरण्यात यावे. याकरिता २१ आॅक्टोबर २०१५ रोजी काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्यासंदर्भातील आदेश संबंधितांना तात्काळ पारित करून महाराष्ट्रातील आदिवासी समाज बांधवांना योग्य न्याय मिळवून द्यावे, अशी मागणी विधानसभा आदिवासी आमदार मंचाच्या आमदारांनी केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास ७ डिसेंबर २०१५ रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी आमदारांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)