शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी बाजार वसुली रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:26 IST

नगर परिषदेने बाजार वसुलीचे कंत्राट दिल्यानंतर आता कंत्राटदाराने बाजार वसुली सुरू केली आहे. या प्रकाराला नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा विरोध होता. त्यांनी हा प्रयोग रद्द करण्याची मागणी केली होती.

ठळक मुद्देकॉँग्रेस मागणीवर ठाम : मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेने बाजार वसुलीचे कंत्राट दिल्यानंतर आता कंत्राटदाराने बाजार वसुली सुरू केली आहे. या प्रकाराला नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा विरोध होता. त्यांनी हा प्रयोग रद्द करण्याची मागणी केली होती. ते आपल्या मागणीवर ठाम असून गुरूवारी (दि.३) कॉँग्रेस सदस्य व सावित्रीबाई फुले चिल्लर भाजी विक्रेता संघाच्यावतीने मुख्याधिकारी चंदन पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले.नगराध्यक्षांच्या एका घोषणेमुळे नगर परिषदेच्या बाजार वसुलीवर गाज पडली. सुमारे ७ लाख रूपये वार्षीक उत्पन्न असलेली बाजार वसुली नगर परिषदेला बंद करावी लागली. मात्र बाजार वसुली बंद करताना तेवढ्याच रकमेच्या उत्पन्नाच्या दुसºया पर्यायाची व्यवस्था असावी असे नगर परिषद अधिनियमात नोंद आहे. त्यामुळे नगर परिषदेला बाजार वसुली कंत्राटी पद्धतीवर देण्याचे सुचले. त्यानुसार, नगर परिषदेने निविदा काढून इ-लिलाव केला. त्यात येथीलच एका कंत्राटदारास १६ लाख ५५ हजारांत बाजार वसुलीचे कंत्राट देण्यात आले. कंत्राटादाराने वसुली सुरू केली आहे.कंत्राटी तत्वावर बाजार वसुलीच्या या प्रकाराला नगर परिषदेतील विरोधी पक्षातील कॉंग्रेस पक्षाचा सुरूवातीपासूनच विरोध होता. यावर त्यांनी जिल्हाधिकारी व आमदारांना निवेदन देऊन कंत्राटी बाजार वसुलीचा हा प्रकार रद्द करण्याची मागणीही केली होती. एवढेच नव्हे तर स्थायी समितीच्या सभेतही विरोध केला होता. मात्र संख्याबळाच्या आधारावर ते कमी पडले व नगर परषदेने कं त्राटी बाजार वसुली सुरू केली.गुरूवारी (दि.३) मुख्याधिकारी पाटील यांच्या दालनात काँग्रेसच्या नगरसेवकांनी बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी सावीत्रीबाई फुले चिल्लर भाजी विक्रेता संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते.शिष्टमंडळात नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गट नेता व बांधकाम समिती सभापती शकील मंसुरी, नगरसेवक सुनील भालेराव, सुनील तिवारी, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, निर्मला मिश्रा, दिपीका रूसे, श्वेता पुरोहीत, सावीत्रीबाई फुले भाजी विक्रेता संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे, राजू नागरीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख व भाजी विक्रेता संघाचे मुकेश शिवहरे उपस्थित होते.बिना पावती वसुली व धमकावणीकॉँग्रेस पक्षाच्या सदस्यांकडून देण्यात आलेल्या निवेदनात ज्या दिवसापासून कंत्राटदाराने बाजार वसुली सुरू केली आहे. त्या दिवसापासून कंत्राटदाराची माणस १० रूपयांऐवजी ३०-४० रूपये भाजी विक्रेत्यांकडून घेत असल्याचे नमूद आहे. एवढेच नव्हे तर भाजी विक्रेत्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांना धमकावणी केली जात आहे. विना पावती कंत्राटदाराची माणसे वसुली करीत असल्याने त्वरीत कंत्राटी बाजार वसुली बंद करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर याविरोधात तिव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून दिला आहे.