शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

कोरोना काळातील वाढीव वीज बिलांची जाळली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

लॉकडाऊन काळात मीटर रीडिंग न घेता वीज वितरण कंपनीने शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहकांना एप्रिल ते जून या ३ महिन्यांचे सरासरी युनिटच्या आधारे अव्वाच्या सव्वा रकमेचे वीज बिल पाठविले आहे. सुमारे ३ महिने सर्व व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने व्यापारी ग्राहकांकडे भरमसाट वीज बिलाची मागणी केली आहे. तसेच ज्यांनी वीज बिल भरले नाही त्यांना नोटीस पाठवून कनेक्शन कापण्याचे कार्य वीज वितरण कंपनी करीत आहे.

ठळक मुद्देभारतीय जनता पक्षाचे आंदोलन : मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांचा केला निषेध, अधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन

लाेकमत न्यूज नेटवर्कदेवरी : वीज बिल माफ करावे व ग्रामीण भागातील विजेची समस्या त्वरित सोडविण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) येथील वीज वितरण कार्यालयावर जनाक्रोश आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वीजबिलाची होळी जाळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. लॉकडाऊन काळात मीटर रीडिंग न घेता वीज वितरण कंपनीने शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहकांना एप्रिल ते जून या ३ महिन्यांचे सरासरी युनिटच्या आधारे अव्वाच्या सव्वा रकमेचे वीज बिल पाठविले आहे. सुमारे ३ महिने सर्व व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने व्यापारी ग्राहकांकडे भरमसाट वीज बिलाची मागणी केली आहे. तसेच ज्यांनी वीज बिल भरले नाही त्यांना नोटीस पाठवून कनेक्शन कापण्याचे कार्य वीज वितरण कंपनी करीत आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून, वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ५) भाजप पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार संजय पुराम व तालुकाध्यक्ष अनिल येरणे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयासमोर जनाक्रोश आंदोलन व निदर्शने करून वीज बिलाची होळी केली. याप्रसंगी वीज बिल माफ करावे व ग्रामीण भागातील विजेची समस्या त्वरित सोडविण्यात यावी, या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता फुलझेले यांना देण्यात आले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, दीपक शर्मा, संतोष तिवारी, राजेश चांदेवार, आफताब शेख, लल्लन तिवारी, विलास शिंदे, इंद्ररजीतसिंग भाटिया, कौशल्या कुंभरे, सविता पुराम, देवकी मरई, गोमती तितराम, सरिता रहांगडाले, रचना उजवणे, माजीद खान, पारस कटकवार, विनोद भांडारकर, कमल येरणे, इमरान खान, किशोर ऐनप्रेडीवार, नितेश वालोदे, दिनेश भेलावे, देवानंद मेश्रा, डॉ. रहांगडाले, योगेश ब्राह्मणकर यांच्यासह मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.वीज ग्राहकांचा छळ थांबवा तिरोडा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ७५ लक्ष वीज ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांचा होत असलेला छळ लगेच थांबविण्यात यावा व कोरोना काळातील वीज बिल माफ करून दिलेले वीज कापणीची नोटीस परत घेण्यात यावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ. विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा महामंत्री मदन पटले, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, बाजार समिती सभापती चिंतामण रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, सभापती डॉ. वसंत भगत, तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, शहर अध्यक्ष स्वानंद पारधी, महिला मोर्चा अध्यक्ष माधुरी रहांगडाले, न.प. सदस्य राजेश गुनेरीया, डॉ. बी.एस. रहांगडाले, पवन पटले, लादेन रहांगडाले, तेजराम चव्हाण, दिगंबर धोके, डॉ. रामप्रकाश पटले, तिरुपती राणे, नितीन पारधी, विजय ग्यानचंदानी, पिंटू रहांगडाले, दीपक पटले, जयप्रकाश गौतम, डिलेश पारधी, अमोल तितिरमारे, प्रकाश सोनकवडे, मक्रम लिल्हारे, मीनाक्षी ठाकरे, शिवलाल परिहार, गुलाब कटरे, तुमेश्वरी बघेले, महादेव कतनकर, बसंत नागपुरे, रवी मुटकुरे व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.ग्राहकांना दिलेली नोटीस रद्द करागोरेगाव : कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने सर्व जनता त्रस्त असताना महावितरणने भरमसाठ वीजबिल देऊन सर्वसामान्यांना मोठा ‘शॉक’ दिला. वीजबिलात सवलत देऊ, असे आश्वासन देऊन महाविकास आघाडी सरकारने शब्द फिरवला व जनतेचा विश्वासघात केला. आता राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांना वसुलीकरिता नोटीस पाठवून पठाणी वसुली सुरू केली आहे. शासनाने अशाप्रकारे नोटीस देणे त्वरित थांबवावे व दिलेल्या नोटीस रद्द करून जनतेचा छळ थांबवावा. तसेच लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांसाठी भाजपकडून येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारचा निषेध नोंदविणारे व मागण्यांचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या व मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. यावेळी आमदार विजय रहांगडाले,  माजी आमदार खोमेश राहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, रेखलाल टेंभरे, डाॅ. साहेबलाल कटरे, गिरधारी बघेले, महामंत्री इसुलाल सोनवाने, आशिष बारेवार,  हिरालाल रहांगडाले, दिलीप चौधरी,  संजय बारेवार, सीता रहांगडाले, रेवेंद्रकुमार बिसेन, सुरेश रहांगडाले,  विश्वजीत डोंगरे, गुड्डू कटरे, डाॅ. लक्ष्मण भगत,  बबलू बिसेन, पंकज रहांगडाले, चित्रकला चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.३ महिन्यांचे वीजबिल माफ कराआमगाव : कोरोना काळातील ३ महिन्यांचे वीजबिल माफ करा, नोटीस देने त्वरित थांबवावे व दिलेल्या नोटीस रद्द करून जनतेला छळवणे बंद करावे, शेतकरी बांधवांना कृषी पंपासाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांसाठी भारतीय जनता  पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच  मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकारी व  तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार केशव मानकर, जि प. माजी सदस्य शोभेलाल कटरे, प्रा.कांशीराम हुकरे, नरेंद्र वाजपेयी, यशवंत मानकर, सुगमचंद्र अग्रवाल, उत्तम नंदेश्वर, मनोज सोमवंशी, बाळू भुजाडे, सुषमा भुजाडे, वेदवती पटले, ज्योती खोटोले, अर्चना चिंलालकर, सुनंदा उके, हरिहर मानकर, कमलेश चुटे, निमेश दमाहे, बाबा पुंडे, रोशन फरकुंडे, बंडू दोनोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :electricityवीज