शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील आरोपींना मुद्देमालासह अटक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

गोंदिया : शहरातील हेमू कॉलनी येथील कन्हैयालाल किसनचंद चांदवानी (६०) यांच्या घरातून २.५३ लाख रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपींना ...

गोंदिया : शहरातील हेमू कॉलनी येथील कन्हैयालाल किसनचंद चांदवानी (६०) यांच्या घरातून २.५३ लाख रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या त्यांच्याकडून चांदवानी यांच्यासह अन्य ठिकाणच्या चोरीतील ३.१४ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

कन्हैयालाल चांदवानी यांच्या मुलाचे लग्न असल्याने २४ जून रोजी रात्री ९.३० वाजता ते घराला कुलूप लावून गेले होते. २५ जून रोजी घरी परत आल्यावर त्यांच्या घरातील आलमारीतून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण २ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. प्रकरणाचा तपास करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बबन सुरेश भागडकर (२४, रा. मरारटोली) व सुनील सुखनंदन गेंडरे (२०, रा. झोपडी मोहल्ला) यांना ताब्यात घेऊन २५ जून रोजी अटक केली. विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली व त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख ७८ हजार रुपये असा दोन ५३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तर यासह ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख १६ हजार ५०० रुपये असा ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज मि‌ळून आला. पोलिसांनी असा एकूण तीन लाख १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.