शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

छुप्या पद्धतीने व्यापारी गाळे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:00 IST

नगर परिषद परिक्षेत्रात जिल्हा परिषदेने स्थानिक शासकीय यंत्रणांना डावलून आपल्या अडेलतट्टू धोरणाने व्यापारी गाळे बांधकाम नियोजन प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र सदर बांधकाम रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे.

ठळक मुद्देजागेचे नियोजन नसताना बांधकाम : बांधकाम अनधिकृत असल्याची अधिकाऱ्यांची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : नगर परिषद परिक्षेत्रात जिल्हा परिषदेने स्थानिक शासकीय यंत्रणांना डावलून आपल्या अडेलतट्टू धोरणाने व्यापारी गाळे बांधकाम नियोजन प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र सदर बांधकाम रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे. व्यापारी गाळे बांधकाम अनाधिकृतपणे होत असल्याचे आता या विभागाचे अधिकारीच सांगत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची शासनाने गांर्भियाने दखल घेवून वेळीच पाऊले उचलण्याची गरज आहे.आमगाव नगर परिषद परिक्षेत्रात बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारत आहे. या रुग्णालयातून रुग्ण सेवा नियमित सुरु आहे. आपल्या उत्कृष्ट सेवेसाठी आरोग्य केंद्राने राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळविले आहे. परंतु याच आरोग्य केंद्रातील मुलभूत सुविधांचा विचार न करता राजकीय पुढाºयांनी आरोग्य केंद्रातील भूखंडावर वक्रदृष्टी आहे.शासनाच्या आरोग्य सेवांच्या विस्तारीकरणाला गती देण्याचे धोरण असताना रुग्णालय सेवा प्रभावित करुन या ठिकाणी व्यापाºयांचे साम्राज्य स्थापित करण्यासाठी जिल्हा परिषद गोंदिया येथील काही पदाधिकारी व सदस्यांनी पाऊल उचलल्याचा आरोप आहे. त्यामुळे या परिक्षेत्रात रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाºयांनी स्थानिक प्रशासन व नियोजनाला डावलून व्यापारी गाळे बांधकामाला सुरूवात केली आहे. परंतु परिक्षेत्रात व्यापारी गाळ्यांसाठी नियोजित जागा उपलब्ध नसूनही वेगळ्याच भूखंडात छुप्या पद्धतीने अनाधिकृत बांधकाम केले जात आहे. रुग्णालयाच्या मागील बाजूस कर्मचाºयांची वसाहत आहे. याच वसाहतीच्या आवार भिंतीला खिंडार पाडून आतमध्ये गाळ्यांचे बांधकाम सुरु असल्याची बाब पुढे आली आहे.शासनातर्फे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र आमगाव येथील वाढती लोकसंख्या आणि या गावाला लागून असलेली दोन राज्यांची सीमा लक्षात घेता या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची मागणी आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र भूखंडावर उपजिल्हा रुग्णालयाची तयार करण्यात यावे. यासाठी नागरिकांच्या मागणीला शासन दरबारी रेटून धरण्यात आले आहे.व्यापारी गाळे नियमबाह्यआमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बांधकाम करण्यात येत असलेले व्यापारी गाळे नियमबाह्य असल्याची कबुली अधिकारी देत आहेत. मात्र ही बाब माहिती असून सुध्दा कारवाही करता येत नसल्याचे एका अधिकाºयांने सांगितले. त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी शासनाकडे तक्रार केली आहे.