शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचे १५ टॉवर बंद

By admin | Updated: December 28, 2016 02:29 IST

केंद्र सरकारने केलेल्या ५०० व १००० च्या नोटाबंदीमुळे पैशाची टंचाई निर्माण झाली.

नरेश रहिले   गोंदिया केंद्र सरकारने केलेल्या ५०० व १००० च्या नोटाबंदीमुळे पैशाची टंचाई निर्माण झाली. या टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने कॅशलेसची संकल्पना पुढे केली. कॅशलेस व्यवहारात मोबाईलची भूमिका महत्वाची राहणार आहे. मात्र त्यात केंद्र सरकारचीच कंपनी असलेल्या बीएसएनएलकडून अडथळा निर्माण होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १५ टॉवर विविध कारणांनी बंद आहेत. नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावा, मोबाईलद्वारे पेटीएमच्या माध्यमातून व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. रोख रकमेवर लगाम लावण्यासाठी सरकारने कॅशलेस व्यवहार करा, असे आवाहन केले. परंतु गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कव्हरेज राहात नसल्यामुळे हा व्यवहार खोळंबत आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी मोबाईल टॉवरच नाही. ज्या ठिकाणी टॉवर आहे तिथे कव्हरेज नाही. यासंदर्भात जिल्ह्यात किती मोबाईल टॉवर आहेत याची माहिती घेतली असता जिल्ह्याच्या आठ तालुक्यात बीएसएनएलचे १०० टॉवर असल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी १५ टॉवर मागील एक ते पाच वर्षापासून बंद पडले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४ टॉवर असून त्यातील झाशीनगर, बाक्टी येथील दोन टॉवर बंद आहेत. आमगाव तालुक्यात ८ टॉवर असून त्यातील करंजी येथील एक टॉवर बंद आहे. देवरी तालुक्यात १४ टॉवर असून त्यातील पुराडा, घोनाडी, पिंडकेपार येथील तीन टॉवर बंद आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ८ टॉवर असून त्यातील गिरोला येथील टॉवर बंद आहे. तिरोडा तालुक्यात ११ टॉवर असून त्यातील परसवाडा, इंदोरा खुर्द व अर्जुनी असे तीन टॉवर बंद आहेत. गोरेगाव तालुक्यात ११ टॉवर असून त्यातील हिरापूर, तुमखेडा असे दोन टॉवर बंद आहेत. गोंदिया तालुक्यात ३१ टॉवर असून त्यातील मोहगाव, महालगाव व नवेगावखुर्द असे तीन टॉवर बंद आहेत. सालेकसा तालुक्यात तीन टॉवर आहेत. स्पेअर्स कार्ड व कनेक्टीव्हीटीमुळे टॉवर बंद असल्याची माहिती देण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील क्षेत्र रेंजमध्ये आहे किती क्षेत्र रेंजमध्ये नाही याची कसलीही माहीती बीएसएनकडे उपलब्ध नाही. नक्षलग्रस्त भागासाठी १७ नवीन टॉवर गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल क्षेत्र आहे. शासनाने सन २०१२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागात अश्या १७ ठिकाणी टॉवर उभारण्यात येत आहे. त्यात कालीमाटी, कातुर्ली, टाकरी, लोहारा, पाथरी, मुंडीपार, जमाकुडो, फुक्कीमेटा, डवकी, येडमागोंदी, धाबेटेकडी, भरनोली, नवनीतपूर, बीजेपार, लटोरी, सोनेखारी व धानोरी या गावांचा समावेश आहे.