गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विटा बनविण्याच्या व्यवसाय केला जातो. परंतु यावर्षी कोंड्याच्या दरवाढीमुळे हा व्यवसाय संकटात सापडला असून वीट भट्टी ठेकेदारांनी कोंड्यासाठी आधीच पैसे मोजून दिल्यानंतरही वीटभट्टी व्यवसायासाठी कोंडा मिळणे कठीण झाले आहे. यामुळे हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे.वीट व्यवसायाला धानाची कापणी झाल्यानंतर डिसेंबर महिन्यापासून सुरुवात केली जाते. तेव्हापासून जवळपास मे ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत हा व्यवसाय अतिशय तेजीत असतो. काही वर्षाअगोदर वीटभट्टीमध्ये लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. परंतु शासनाने वीटभट्टींवर लाकडांचा वापर करण्यावर बंदी घातल्यामुळे कोंड्याचा वापर वीटभट्टीत केला जातो. यामुळे कोंड्याचे भाव गगनाला भिडले आहेत. विटा व्यावसायिक चांगलेच हैराण झाले आहेत.या व्यवसायाला हिवाळ्यात सुगीचे दिवस येतात. परंतु जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हा व्यवसाय सुरू असूनही यावर्षी कोंड्याचा तुटवड्यामुळे वीटभट्टी ठेकेदार अडचणीत आले आहेत. हा व्यवसाय साधारणत: नदी, नाले यांच्या काठाशीच चालत असल्याचे दिसून येते. कारण या व्यवसायासाठी कोंडा व पाण्याची तेवढीच आवश्यकता असते. यामुळे जोमाने हा व्यवसाय नदी नाल्यांच्या काठाशी सुरू असल्याचे चित्र दृष्टीस पडते. कोंडा हा वीटभट्टीकरिता आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन कोंड्याच्या प्रत्येक गाडीमागे १० हजार रुपये ठेकेदारांना मोजावे लागत आहेत. दरम्यान काही ठेकेदारांनी कोंड्यासाठी तरध आधीच बुकिंग केले असल्याचेही चर्चा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन केले जाते. यामुळे राईस मिल संख्या ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन केले जाते. यामुळे राईस मिल संख्या ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अल्पशा पावसाने यावर्षी धान उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. पर्यायाने धान उत्पादन कमी झाल्याने याचा फटका सर्व राईस मिलांना बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात धानाची मिलिंग केली जात नसल्याने कोंडा मिलमध्ये मुबलक प्रमाणात मिळत नाही. यामुळेच कोंड्याचे भाव वाढलेले आहेत. (शहर प्रतिनिधी)
कोंडा दरवाढीमुळे वीट उद्योग संकटात
By admin | Updated: July 7, 2014 00:00 IST