शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

- तर आरोग्य कर्मचाऱ्यांचा पोलिओ अभियानावर बहिष्कार

By admin | Updated: March 29, 2017 01:35 IST

आरोग्य सेविका व आरोग्य सेवकांच्या पदोन्नती ३१ मार्चपर्यंत जि.प. प्रशासनाने निकाली न काढल्यास आरोग्य कर्मचारी

 ५०६ कर्मचाऱ्यांचा समावेश : पदोन्नतीवरून जि.प. प्रशासनाविरुद्ध आक्रोश गोंदिया : आरोग्य सेविका व आरोग्य सेवकांच्या पदोन्नती ३१ मार्चपर्यंत जि.प. प्रशासनाने निकाली न काढल्यास आरोग्य कर्मचारी २ एप्रिल २०१७ रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण अभियानावर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आला आहे. १ लाख १० हजार बाहकांच्या आरोग्याशी खेळणे आरोग्य कर्मचाऱ्यांना मुळीच मान्य नाही, पण हक्कासाठी कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी २२ मार्च रोजी आंदोलन केले. त्यापूर्वी ३ मार्च रोजी व नंतर २५ मार्च रोजी निवेदन देण्यात आले. परंतु मागण्यासंदर्भात जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजकुमार पुराम व कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे २२ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी संघटनांना एक दिवसीय धरणे आंदोलन करणे भाग पडले. तरीही मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे येत्या २ एप्रिल रोजी पल्स पोलीओ मोहिमेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. जि.प.प्रशासनातील ८ ते १० विभागाच्या पदोन्नती २०१५ च्या बिंदूनामावलीनुसार करण्यात आली. त्याचप्रकारे आरोग्य विभागातील आरोग्य सेविकांमधून आरोग्य सहायिका ही पदोन्नती २०१५ च्या बिंदूनामावली स्थितीवर करण्याचे धोरण जि.प. प्रशासनाने ठरविले आहे. परंतु समकक्ष आरोग्य सेवकांचे आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती २०१५ च्या बिंदू नामावली स्थितीवर का करण्यात आली नाही? समानतेच्या तत्वाची पायमल्ली जि.प. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजकुमार पुराम यांच्याकडून होत आहे, असा त्यांचा आरोप आहे. सदर मागण्यांचे संदर्भात ३१ मार्च २०१७ पर्यंत जि.प. प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन आरोग्य सेविका व आरोग्य सेवक पदांच्या पदोन्नती कराव्यात, अन्यथा २ एप्रिल च्या पोलीओ मोहिमेवर बहिष्कार टाकणार आहेत. आमच्याकडेच दुर्लक्ष का? मागील ४ ते ५ वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली नाही. यात आरोग्य कर्मचाऱ्यांनाच का वेठीस धरले आहे? जि.प. सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व जि.प. चे पदाधिकारी रात्रंदिवस जनतेला आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडेच का दुर्लक्ष करीत आहेत? असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. सर्व प्रलंबित मागण्या जिल्हास्तरीय आहेत. जि.प. प्रशासनाने विचार केला तर सर्व मागण्या निकाली निघू शकतात.