शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेल, विहिरीत पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: May 29, 2015 01:23 IST

ग्रामपंचायत पाऊलदौनाअंतर्गत येत असलेल्या बाघडोंगरी गावात पिण्याच्या व घरगुती वापरात येणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

बाघडोंगरीत पाण्यासाठी मरमर : ड्रमने पाणी नेऊन भागविली जाते गरजआमगाव : ग्रामपंचायत पाऊलदौनाअंतर्गत येत असलेल्या बाघडोंगरी गावात पिण्याच्या व घरगुती वापरात येणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील बोअरवेल, विहिर कोरड्या पडल्या आहेत. तलावातील पाणी बैलबंडीने ड्रामद्वारे आणले जात आहे.अनेक वर्षांपासून बाघडोंगरीत पिण्याच्या व घरगुती वापराकरिता पाणी ही मोठी गंभीर समस्या आहे. या गावात गोंड समाज जास्त आहे. ग्रामपंचायत पाऊलदौना अंतर्गत बाघडोंगरी, पिपरटोला, बाघाटोला, जांभुळटोला यांना मोठी नळ योजना अंत्यत गरजेची आहे. गावातील शेतीला ओवारा प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे गावातील तलावात येऊ शकतो. मात्र प्रशासनाच्या हलगर्जी व दुर्लक्षित पणामुळे हा गाव सतत शेतीला मिळणारे पाणी यापासून वंचित राहतो. जर ओवारा प्रकल्पाचे पाणी सोनेखारणीजवळील कालव्याद्वारे बाघडोंगरी तलावात सोडले तर शेती उत्पन्न समाधानकारक होईल. तसेच उन्हाळ्यात विहिर व बोअरवेल यांच्यात जलस्तर वाढून पाणी समस्या राहणार नाही. अंजोरा गावाजवळून कालव्याद्वारे पाणी बाघडोंगरी गावाला दिल्या जाऊ शकते.स्थानिक जनप्रतिनिधी यांनी प्रयत्न केले तर पाणी समस्या मिटू शकते, अशी प्रतिक्रिया उपसरपंच किशोर बोळणे यांनी व्यक्त केले. बाघडोंगरीत घरगुती कामाकरिता व पिण्याकरिता बैलबंडीने ड्रामद्वारे पाणी नेणारे शेतकरी बारीकराम कुंभरे यांनी याबाबत बोलताना ही पाणी समस्या ही मोठी गंभीर समस्या असून त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)