शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी दोघींची गळा आवळून हत्या

By admin | Updated: May 26, 2015 01:51 IST

चारित्र्यावर संशय घेऊन एका इसमाने आपल्या पत्नीचा खून केला, तर दुसऱ्या घटनेत एका महिलेवर प्रियकराने

संशयी पतीचे कृत्य : दुसरीला प्रियकरानेच बदनामीच्या भीतीने संपविलेगोंदिया : चारित्र्यावर संशय घेऊन एका इसमाने आपल्या पत्नीचा खून केला, तर दुसऱ्या घटनेत एका महिलेवर प्रियकराने बळजबरी करून नंतर तिने वाच्यता करू नये म्हणून तिचाही खून केल्याची घटना रविवारी घडली. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माल्ही येथील संजय रामदास गिऱ्हेपुंजे (२५) हा पत्नी पल्लवी (२४) हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यात त्यांचे दोघांचे भांडण झाले. यात संजयने पल्लवीचा गळा आवळून तिला कायमचे संपविले. ही घटना रविवारच्या दुपारी २.३० वाजतादरम्यान घडली. गोरेगावच्या इंदिरानगरातील पवन धानू न्यायकरे (२२) यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकेपार येथील आहे. लता संजय टेंभूर्णे (३८) या विवाहितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला. शनिवारच्या रात्रीदरम्यान आरोपी दुर्गाप्रसाद गुलाबराव तुपटे (२८) रा.लक्ष्मीनगर, गौतमबुध्द वॉर्ड याने हे कृत्य केले. तिच्या नाकातून, तोंडातून रक्त वाहात होते. सदर महिलेची बहिण तुळसा राजेश दरवडे (३९) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नागपूर येथे राहणाऱ्या पतीशी लताचा घटस्फोट झाला होता. ती मागील १५ वर्षापासून आई-वडीलांकडे राहायला आली. बहिणीच्या आधाराने शेजारच्या घरी ती भाड्याने राहात होती. शनिवारच्या सायंकाळी ७ वाजताच्यादरम्यान घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी ती घराबाहेर पडली. मात्र ती घरी आलीच नाही. रविवारच्या सकाळी ७ वाजतादरम्यान पिंडकेपार रस्त्यावर तिचा मृतदेह आढळला. दुर्गाप्रसाद व लता यांचे मागील अनेक दिवसांपासून संबंध होते, यातून ती त्याला पैश्याची मागणी करायची असे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या आधी त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. त्यानंतर त्याला दुसरीकडे पैसे देण्यासाठी जायचे होते. उशीर होत असल्याचे सांगत त्याने जाण्याचा प्रयत्न केला तर तिने त्याला दिड हजार रूपये मला दे अन्यथा ही माहिती तुझ्या घरी देईल, अशी धमकी दिली. या धमकीमुळे तो संतापला व त्याने तिचा गळा आवळून खून केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)