शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 00:22 IST

प्रेमसंबंधातून गर्भवती राहिल्याने तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर दोन महिने संसार केला.

साकोली तालुक्यात : जांभळीच्या जंगलात केला गर्भपात साकोली : प्रेमसंबंधातून गर्भवती राहिल्याने तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर दोन महिने संसार केला. मात्र गर्भातील मुल माझे नाही, या संशयावरुन पत्नीला अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी भाग पाडले. यात महिलेचा मृत्यू झाला. गर्भपात साकोली तालुक्यातील जांभळी सडक येथील जंगलात करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गर्भपात करणारा डॉ.चैतराम बघेले (४८) रा. खैरलांजी ता. साकोली व मनिषाचा पती राजु सावनलाल फुंडे (२५) रा. नवेगाव धुसाळा ता.मोहाडी या दोघांना अटक केली आहे. राजु व मनिषा या दोघांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून मनिषा पाच महिन्याची गर्भवती राहिली. आपली बदनामी होईल या भितीपोटी राजु व मनिषा या दोघांनी ३० मे रोजी गोबरवाही येथे विवाह केला. व नागपूर येथे दोघेही संसार करु लागले. राजुचा संशय दिवसेंदिवस बळावत होता. त्यामुळे मनिषाच्या गर्भात वाढणारे मुल हे आपले नसुन दुसऱ्याचा कुणाचे तरी असावे असा संशय त्याला होता. त्यामुळे त्यांचे मनिषाला धमकी देऊन गर्भपात करण्यास बाध्य केले व मनिषाला त्यांच्याच सोबत संसार करायचे होते. त्यामुळे मनिषाही अवैध गर्भपात करण्यासाठी तयार झाली. ठरल्याप्रमाणे राजु व मनिषा ५ ला बसने नागपुरवरुन साकोली येथे आले. साकोलीला आल्यानंतर बोगस डॉक्टर बघेले याच्या दुचाकीवर तिघेही जांभळी सडक येथील जंगल शिवारात गुढरी तलावातील नहरात थांबले व तिथेच या बोगस डॉक्टरने मनिषाचे गर्भपात केले व गर्भपात केल्यानंतर डॉक्टरने दोघांनाही साकोली बसस्थानकावर सोडले. या दरम्यान मनिषाला रक्तस्त्राव सुरु झाला. त्यामुळे राजुने मनिषाला साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव जास्त असल्यामुळे साकोली येथील डॉक्टरांनी मनिषाला भंडारा येथे हलविले. उपचारादरम्यान मनिषाचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच मनिषाची आई तिरणबाई रहांगडाले रा. डोंगरी बुज. यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. (तालुका प्रतिनिधी)