शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सत्र सुरू होऊनही पुस्तके हातात पडली नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST

गोंदिया : शिक्षणाचा सक्तीचा अधिकारअंतर्गत शासनाकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. त्यानुसार, यंदा सर्व शिक्षा ...

गोंदिया : शिक्षणाचा सक्तीचा अधिकारअंतर्गत शासनाकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. त्यानुसार, यंदा सर्व शिक्षा अभियानकडून जिल्ह्यातील ९५७८८ विद्यार्थ्यांसाठी ५८८१२७ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. आता कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असून शाळा सत्र सुरू झाले असून पुन्हा ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके आलेली नाहीत. अशात या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा असा प्रश्न पडत आहे. अगोदरच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामुळे कित्येक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कित्येकांकडे स्मार्टफोन नसल्याने ते शिक्षणापासून वंचित आहेत. तर काही ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने तेही शिक्षणाला मुकत आहेत. त्यात आता ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल व नेटवर्क आहे त्यांची पुस्तकेच हाती नसल्याने अडचण होत आहे. आता कुठे पुस्तकांचे वितरण सुरू झाले असून ते झाल्यावरच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शाळा सुरू झाल्याचा अनुभव येणार.

--------------------------------

१० टक्के मुलांनीच केली पुस्तके परत

पूर्वी विद्यार्थ्यांनी वापरलेली पुस्तके घरातील धाकट्यांना वापरता येत होती किंवा गरजूंना दिली जात होती. मात्र, आता ती पद्धत संपुष्टात आली आहे. आता दरवर्षी मुलांना नवीन पुस्तके द्यावी लागतात. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. ही बाब लक्षात घेत शिक्षण मंडळाने यंदापासून विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेण्यास सांगितले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील फक्त १० टक्केच विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत मिळाली आहेत.

------------------------------

पुस्तके नाहीत, अभ्यास कसा करणार ?

आमचा ऑनलाईन अभ्यास सुरू झाला आहे. मात्र, आमच्या हाती आतापर्यंत पुस्तके आलेली नाहीत. अशात आम्ही अभ्यास कसा करावा. पुस्तके हाती आल्यावरच आम्हांला त्यातील काही समजणार. त्यामुळे आता पुस्तकांची वाट पहात आहे.

- कर्णिका रहिले (पदमपूर)

--------------------------

कोरोनामुळे यंदाही ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अभ्यास करण्यासाठी आम्हांला पुस्तकांची गरज असून ती आम्हांला आतापर्यंत मिळालेली नाहीत. अशात आता आम्ही ऑनलाईन वर्गात राहून अभ्यास कसा करावा. पुस्तकांची वाट बघत आहोत.

- अंश भेंडारकर (अर्जुनी-मोरगाव)

-----------------------------

कोट

आम्ही सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून त्यांच्याकडील पुस्तके परत घेतली होती. त्या पुस्तकांचे आताच्या विद्यार्थ्यांत वितरण केले आहे. त्यात आता सध्या ब्रिज कोर्स सुरू असून ज्या विदयार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. त्यांचाही अभ्यास बुडणार नाही.

- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

----------------------------

वर्गनिहाय विद्यार्थी संख्या

पहिली - १४५६५

दुसरी - १८५४२

तिसरी - २०४७६

चौथी- २०४०६

पाचवी- १९६६४

सहावी - १९४४०

सातवी- २००६३

आठवी- २०६०१