शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

बोनस, किंमत नाही, ना मिळाला नफा; मालामाल होण्यासाठी धान खरेदी करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून केली जाते. महामंडळाच्या धान विक्री केंद्रावर या वर्षी प्रतिक्विंटल १९६० रुपये याप्रमाणे धानखरेदी झाली. परंतु, गेल्या वर्षी दिलेला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस या वर्षी बंद करण्यात आल्याने धानविक्रीतून शेतकऱ्यांचे ‘मालामाल’ होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. शेतमालाला न मिळणारे दर आणि वाढती मजूर टंचाई डोकेदुखी ठरू लागली आहे. तरुणांनी शेतीचा रस्ता सोडला आहे.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आपला देश कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो. मात्र, कृषी धोरणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतलेच जात नाहीत. त्यामुळे खर्चावर आधारित शेतमालाचे दर मिळतच नाहीत. गोंदिया जिल्ह्यात धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, शेतकऱ्याने धानाचे घेतलेले उत्पन्न आज सरकार घेण्यास तयार नसल्याने गोरगरीब शेतकऱ्यांचे धान उघड्यावर आहेत. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून केली जाते. महामंडळाच्या धान विक्री केंद्रावर या वर्षी प्रतिक्विंटल १९६० रुपये याप्रमाणे धानखरेदी झाली. परंतु, गेल्या वर्षी दिलेला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस या वर्षी बंद करण्यात आल्याने धानविक्रीतून शेतकऱ्यांचे ‘मालामाल’ होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. शेतमालाला न मिळणारे दर आणि वाढती मजूर टंचाई डोकेदुखी ठरू लागली आहे. तरुणांनी शेतीचा रस्ता सोडला आहे. शेतशिवारात चाळिशी पार करणारे आणि ज्येष्ठ नागरिकच पाहायला मिळतात. इंधन दरवाढीचा फटका शेतीला बसला आहे.

शासन दलालांवर खूश, शेतकऱ्यांवर नाराज- शेतकऱ्यांच्या हातात धान येण्याच्या अगोदरच शासनाने कृषी केंद्र उघडायला हवे. परंतु, शेतकऱ्यांचे धान कृषी केंद्रावर येऊनही शासन धान खरेदी केंद्र सुरू करीत नाही. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला नाइलाजाने धान व्यापाऱ्याला विकावे लागते. या शासनाच्या नीतीमुळे दलालांना मोठा फायदा, तर शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो. शासनाने शेतकरी हिताचे धोरण सुरू करावे.

बोनसअभावी शेतकरी संकटात मागच्या वर्षी धानाला बोनससह २५०० रुपये क्विंटलमागे भाव पडला. परंतु, यंदा फक्त १९,६०० रुपये भाव दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे धान उत्पादन करणारा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

क्विंटलमागे ६०० रुपयांचे नुकसानगेल्या वर्षी एक क्विंटल धानाला १७०० रुपये व बोनस ८०० रुपये असा एकूण २५०० रुपये भाव मिळत होता. या वर्षी शासनाकडून बोनस बंद केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका क्विंटलमागे ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. 

व्यापारी म्हणतात...

धान घेणे आम्हालाही परवडत नाही. परंतु, अनेक वर्षांपासून सुरू असलेला व्यवसाय सुरू ठेवायचा म्हणून आम्ही धान खरेदी करीत आहोत. आम्ही पैसे गुंतवून धान खरेदी करतो. परंतु, योग्य वेळी धान विक्री होत नाही किंवा धानाला भाव मिळत नसल्याने आम्हालाही अडचण होते.- गणेश भेंडारकर, व्यापारी शिलापूर

शेतकऱ्यांना योग्यवेळी पैसे मिळावेत म्हणून दोन पैसे कमी किमतीत शेतकरी धान विक्री करतो. त्यांना पैसे मिळून जातात आणि आम्हालाही दोन पैसे कमविता येतात, यासाठी धान खरेदी करतो. परंतु, धान खरेदी करताना आता खूप अडचणी येत आहेत.- हंसराज रहिले, व्यापारी शिलापूर 

गोंदियात होणार २ लाख ३५ हजार हेक्टरवर पेरा

- गोंदिया जिल्ह्यात धानाची शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असून, २ लाख ३५ हजार ४७६ हेक्टरवर या वर्षी धान लागवड होत असते.  nदरवर्षी गोंदिया जिल्ह्यात २ लाख ३५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जात असल्याने यासाठी  शेतकरी कामाला लागला आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक चणचण

या वर्षी मोठ्या प्रमाणात धानपिकाची लागवड होणार आहे. परंतु, रब्बी पिकाचे धान मार्केटिंग फेडरेशनने व आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केले नाही. त्यामुळे हातात पैसे नाही. खरिपाचा हंगाम येऊन ठेपला असताना आम्ही आर्थिक अडचणीत आहोत.- धनपत भोयर, माजी सरपंच तथा शेतकरी शिलापूर

ऐन हंगामात शेतमालाचे भाव व्यापाऱ्यांकडून पाडले जातात. मार्केटिंग फेडरेशन किंवा आदिवासी विकास महामंडळाकडून बोनस देणे बंद केल्याने भातपिकाची पेरणी व लागवड करणार कशी, या विवंचनेत येथील बळिराजा सापडला आहे. - गजानन शेंडे, शेतकरी शंभूटोला, ता. आमगाव.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी