शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या समितीचीच बोगसगिरी; तक्रारीशिवाय कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

डॉक्टरकीची कोणतीही पदवी न घेता केवळ एखाद्या रुग्णालयात डॉक्टरच्या हाताखाली काही वर्षे काम केलेले लोक फक्त अनुभवाचा आधार घेऊन रुग्णांवर उपचार करतात. त्यांच्या डिग्रीची शहानिशा न करता लोक हातगुण चांगला म्हणून त्याच्याकडे उपचारासाठी रांगेत उभे राहतात. यात एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यावरच पोलखोल होते. अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी नगरपालिका, तालुका व जिल्हा प्रशासन पुढे येत नाही.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसतानाही रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या विरोधात गेल्या वर्षभरात फक्त १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने लोकांनी आता तक्रार करणेही बंदच केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही राजरोसपणे बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जातात. त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी तालुका चौकशी समितीने अधिक सक्रिय होऊन काम करणे गरजेचे आहे.डॉक्टरकीची कोणतीही पदवी न घेता केवळ एखाद्या रुग्णालयात डॉक्टरच्या हाताखाली काही वर्षे काम केलेले लोक फक्त अनुभवाचा आधार घेऊन रुग्णांवर उपचार करतात. त्यांच्या डिग्रीची शहानिशा न करता लोक हातगुण चांगला म्हणून त्याच्याकडे उपचारासाठी रांगेत उभे राहतात. यात एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यावरच पोलखोल होते. अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी नगरपालिका, तालुका व जिल्हा प्रशासन पुढे येत नाही. सालेकसा तालुक्याच्या साखरीटोला येथील एका बोगस डॉक्टरने चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया करून एका तरुणीचा जीव घेतला. यानंतर त्याच्यावर कारवाई केली. 

सात तालुक्यांत एकही कारवाई नाही- गोंदिया जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे; परंतु तालुका किंवा जिल्हा समित्या या बोगस डॉक्टरांवर कारवाई करीत नाहीत. कोरोनाच्या काळातही बोगस डॉक्टरांचा व्यवसाय जोमाने चालला. आमगाव, देवरी, सडक-अर्जनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिराेडा व गोंदिया या सात तालुक्यांत बोगस डॉक्टरांवर मागील तीन वर्षांत एकही कारवाई नाही.

तालुका समितीत कोण-कोण असते?तालुका समितीतील सदस्य तालुका समितीत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी असतात. नगरपालिका व महापालिका स्तरावर स्वतंत्र समिती असते. जिल्हाधिकारी स्तरावरील समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक असे अधिकारी असतात.

बोगस डॉक्टरांसंदर्भात तक्रार आल्यास आम्ही कारवाई करतो. बोगस डॉक्टर आहेत अशी तक्रार आलीच नाही तर कारवाई कशी करणार? तक्रार जिल्हाधिकारी किंवा मुकाअ यांच्याकडे आल्यास आम्ही कारवाई करतो. वेळ पडली तर बोगस डॉक्टरांवर फौजदारी कारवाईदेखील केली जाते.- डॉ. वेदप्रकाश चौरागडे, तालुका वैद्यकीय अधिकारी.

 

टॅग्स :doctorडॉक्टर