शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव तालुक्यात युरियाचा काळाबाजार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:35 IST

आमगाव : मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धान पिकांना संजीवनी मिळाली आहे. धानाची वाढीसाठी युरिया खताची मागणी वाढली ...

आमगाव : मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धान पिकांना संजीवनी मिळाली आहे. धानाची वाढीसाठी युरिया खताची मागणी वाढली आहे. मात्र, तालुक्यात युरिया खत मिळत नसून काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून अतिरिक्त दराने विक्री करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट केली जात असून, याकडे कृषी विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

खरीप हंगामातील धान पिकाला सध्या युरिया खताची गरज आहे. परंतु, युरिया खताचा पुरेशा प्रमाणात पुरवठा न केल्याने टंचाई निर्माण झाली आहे, तर काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. स्टॉक रजिस्टरमध्ये युरिया खताची विक्री झाल्याचे दाखवीत आहे. गरजू शेतकरी २६६ रुपयांच्या युरियाची ४०० रुपयांना विकत घेत आहेत. युरिया कंपोस्ट बॅगचे कृषी केंद्रचालक बिल देत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. तुम्हाला युरिया खताची बॅग घेऊन जायचे असेल तर घ्या, तुम्हाला बिल मिळणार नाही असे बजावले जात आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात युरियाचा अधिक प्रमाणात काळाबाजार केला जात आहे. तालुक्यात युरियाचा सर्रासपणे काळाबाजार सुरू असताना कारवाई करण्याकडे कृषी विभागाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी याची दखल घेऊन युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.