शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

फुलचूर नगरपंचायतसाठीच्या आंदोलनाला भाजपचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

गोंदिया : शहराजवळील फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतींचे समायोजन करून त्यांना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाला तातडीने पाठविण्यात ...

गोंदिया : शहराजवळील फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतींचे समायोजन करून त्यांना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाला तातडीने पाठविण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश चतुर तसेच फुलचूर व फुलचूरटोलावासीयांनी बुधवारपासून (दि. ८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाला सुरुवात केली असून जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला भाजपचे समर्थन जाहीर केले व पत्र दिले.

फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतींचे समायोजन करून नगरपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. याबाबत २१ डिसेंबर २०१९ रोजी दोन्ही ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव सादर करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, या संदर्भात मार्गदर्शन व सूचनांच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाकडून नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. नगर विकास मंत्रालयाने या संदर्भात तसा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केल्यानंतरही २ वर्षांपासून नगरपंचायतीचा प्रस्ताव पडून आहे.

यामुळे फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. तसा प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. यावर आंदोलनाचा इशाराही माजी जि.प. सदस्य चतुर व ग्रामस्थांनी दिला होता. मात्र, त्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी बुधवारपासून (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावर भाजपा जिल्हाध्यक्ष मानकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला भाजपचे समर्थन जाहीर केले. यावेळी माजी आमदार हेमंत पटले, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, गजेंद्र फुंडे, मनोज मेंढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.