शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने जागा राखली

By admin | Updated: May 31, 2016 01:43 IST

शहरातील प्रभाग क्र मांक १ मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली जागा राखली. या

गोंदिया : शहरातील प्रभाग क्र मांक १ मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली जागा राखली. या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजू विठ्ठलराव पारधी यांचा विजय झाला. तर दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचे उमेदवार लोकचंद रहांगडाले राहिले. या विजयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. प्रभाग क्रमांक १ ‘ड’ या सर्वसाधारण वर्गातील सदस्य अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या एकाच जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. पांडे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते त्यामुळे ही जागा भाजपकडे होती. आता रिक्त झालेली ही जागा परत मिळविण्यासाठी भाजपकडून चांगलीच मेहनत घेण्यात आली होती. तर ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी अन्य पक्ष व अपक्ष उमेदवारांनीही चांगलाच जोर लावला होता. रविवारी (दि.२९) यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात फक्त ३८. ८६ टक्के मतदान झाले होते. दरम्यान सोमवारी (दि.३०) येथील स्वर्ण जयंती कार्यालयात सकाळी १० वाजतापासून मतमोजणी करण्यात आली. यात भाजपचे राजू पारधी यांनी १२९६ मते घेऊन विजय मिळविला. तर दुसऱ्या क्रमांकावर ११७६ मते घेऊन कॉंग्रेस उमेदवार लोकचंद रहांगडाले राहिले. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विनायक खैरे ११३१ मते घेऊन होते. विशेष म्हणजे मतमोजणी केंद्रासमोर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळपासूनच हजर होते. पारधी यांचा विजय झाल्याची घोषणा होताच भाजपच्या गोटातून आनंद व्यक्त करीत फटाके फोडण्यात आले. कमी झालेली जागा पुन्हा परत मिळाल्याने भाजपच्या गोटात अत्यधीक आनंद दिसून आला. (शहर प्रतिनिधी) १२० मतांचा फरक ४या पोटनिवडणुकीत प्रभागातील १३ हजार १६७ मतदारांना मतदानाचा हक्क बजवावयाचा होता. मात्र यातील फक्त ५११७ मतदारांनीच मतदान केले. परिणामी रिंगणात असलेल्या सहा उमेदवारांत मतांचे विभाजन झाले. त्यामुळे निवडून आलेले राजू पारधी तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लोकचंद रहांगडाले यांच्यात फक्त १२० मतांचाच फरक आहे.