लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने कर्जमाफीला शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे नाव देवून मोठ-मोठ्या गोष्टी केल्या. मात्र कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक अटी लावल्या. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे भाजप सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याची टिका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली.तालुक्यातील ग्राम लोधीटोला (घिवारी) येथील सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, रमेश लिल्हारे, विमल नागपुरे, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, प्रमिला करचाल, अनिल मते, ओमप्रकाश भक्तवर्ती, निता पटले, विद्या टेंभरे, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, योगराज उपराडे, स्नेहा गौतम, विद्या भालाधरे, जगतराय बिसेन, राजेश कटरे, सुनिता नागपुरे, ममता लिल्हारे, रजनी ठाकरे, मनिराम गराडे, शामराव लिल्हारे, फत्तेलाल हनवते, तिलकचंद येळे, प्रतिभा लिल्हारे, चैनलाल रणगिरे, काशिराम सुलाखे, गेसलाल लिल्हारे उपस्थित होते. या वेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, विधानसभा क्षेत्रातील सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांवर आमदार अग्रवाल यांनी स्थायी स्वरुपात तोडगा काढला असल्याचे सांगितले.
भाजप सरकारची कर्जमाफी ‘फसवी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:56 IST
राज्य सरकारने कर्जमाफीला शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे नाव देवून मोठ-मोठ्या गोष्टी केल्या. मात्र कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक अटी लावल्या. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे भाजप सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याची टिका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली.
भाजप सरकारची कर्जमाफी ‘फसवी’
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : लोधीटोला येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन