शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST

इसापूर : अर्जुनीमोर तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकविला आहे. सरपंचपदी कल्पना शिवकुमार करंबे तर उपसरपंच पदावर दिलीप नामदेव ...

इसापूर : अर्जुनीमोर तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकविला आहे. सरपंचपदी कल्पना शिवकुमार करंबे तर उपसरपंच पदावर दिलीप नामदेव सोनवणे विराजमान झाले आहेत. या सरपंच व उपसरपंच निवडीत इसापूर गावात काही वेळ तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

विशेष म्हणजे भाजप समर्थित तीन उमेदवार निवडून आले होते. तर गाव विकास पॅनल समर्थित तीन उमेदवार निवडून आले होते. गजानन चांदेवार यांच्या गटाची एक महिला उमेदवार निवडून आली होती. त्यामुळे एकमेव निवडून आलेल्या सदस्य कल्पना करंबे यांची भूमिका निर्णायक होती. गजानन चांदेवार हे भाजपा समर्थक असल्याने करंबे यांना सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून सरपंचपदी आरूढ करण्यासाठी भाजपच्या तीन उमेदवारांनी मतदान केले. कल्पना करंबे यांना चार मते मिळाली तर गाव विकास पॅनलच्या दीक्षा लांजेवार यांना तीन मते मिळाली. तर उपसरपंच पदासाठी गाव विकास पॅनलने दिलीप सोनवणे यांचे नामनिर्देशन पत्र उपसरपंच पदासाठी दाखल केले होते. भाजप समर्थित दिलीप सोनवणे यांना आपल्या गटात आणण्यासाठी विकास पॅनलने आटोकाट प्रयत्न करूनही दिलीप सोनवणे यांनी भाजपा समर्थित उमेदवार कल्पना करंबे यांना मतदान केले तर उपसरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन असलेले दिलीप सोनवणे यांना बिनविरोध उपसरपंच पदावर विजयी घोषित करण्यात आले. अध्यासी अधिकारी म्हणून तलाठी एम.एच.टेंबरे यांनी काम पाहिले. तलाठी निमकर ग्रामसेवक विनोद एस.श्रीवास्‍तव उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक विनोद श्रीवास्तव यांनी विजयी सरपंच कल्पना करंबे व उपसरपंच दिलीप सोनवणे व इतर ग्रामपंचायत सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.