शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

भाजप दलित विरोधी

By admin | Updated: May 24, 2016 02:01 IST

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिव शर्मा यांना पक्षातून निष्कासीत केल्यानंतरही भारतीय जनता पक्ष त्यांना समर्थन करीत आहे.

भ्रष्टाचाऱ्यांना देते समर्थन : राकेश ठाकूर यांचा आरोप गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिव शर्मा यांना पक्षातून निष्कासीत केल्यानंतरही भारतीय जनता पक्ष त्यांना समर्थन करीत आहे. दुसरीकडे दलित समाजातील भाजपच्या दोन निष्ठावान कार्यकर्त्यांना गुन्ह्यात अडकविल्यावरही भाजप त्यांच्या मदतीला पुढे आलेली नाही. यातून भाजपची दुटप्पी भूमिका व भाजप दलितविरोधी असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी सभापती राकेश ठाकूर यांनी पत्रकातून केला आहे. आमदार अग्रवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या शर्मा यांना भाजपातून निष्कसीत करण्यात आले आहे. असे असतानाही शर्मावर लागलेली ३०७ कलम हटविण्यासाठी भाजपकडून अधिकारी व राजनेत्यांना निवेदन दिले जात आहे. दुसरीकडे पंकज यादव यांच्यावर हल्ला झाला त्या प्रकरणात पोलिसांनी अभिमन्यू चतरे व अजय बिरीया या दोघांवर गुन्हा नोंदविला आहे. चतरे बजरंग दलचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत तर बिरीया भाजपचे निष्ठावान कार्यकर्ता आहे. हे दोघे दलीत समाजातील व गरीब आहेत त्यामुळे भाजप त्यांच्या मदतीला धावली नाही. शर्मा पैसेवाला असून भ्रष्टाचार करून पक्षाला पैसे देत असल्याने भाजप त्याच्या मागे उभी आहे. खासदार नाना पटोले यांनी भ्रष्टाचार व अपराध संपवायचे असल्याबाबत बोलत आहेत. तर दुसरीकडे शर्मा सारख्या भ्रष्टाचारींना समर्थन देऊन प्रोत्साहन देत आहेत. शिवाय हेच खासदार पटोले असामाजीक तत्वांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट करवून त्यांना राजकीय संरक्षण देत आहेत. याशिवाय कॉंग्रेस भ्रष्टाचारी असल्याचे बोलत असून कॉंग्रेससोबत जिल्हा परिषदेत हातात हात टाकून बसले आहेत. ३० दिवसांत या युतीचा निर्णय घेणार असल्याचे खासदार नाना पटोले बोलत होते. मात्र ३० दिवस लोटून गेल्यावरही युतीवर भाजपने काहीच निर्णय घेतला नाही. यातून हे सत्तासुख भोगण्यासाठी कॉंग्रेससोबत असल्याचे स्पष्ट होते. आपल्या स्वार्थासाठी ते राजकारण करीत असून ते आपली पोळी शेकत असल्याचा आरोप ठाकूर यांनी पत्रकातून केला आहे. (शहर प्रतिनिधी)