शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Video : पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
3
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
4
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
5
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
6
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
7
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
8
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
9
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
10
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
11
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
12
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
13
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
14
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
15
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
16
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
17
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
18
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
19
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
20
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू

गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप व पालक सभा

By admin | Updated: August 14, 2014 23:48 IST

शालेय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रक्रियेत शिक्षक-विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सक्रीय सहभाग असावा, यासाठी स्वामी विवेकानंद विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय इटखेडा येथे शिक्षक

इटखेडा : शालेय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रक्रियेत शिक्षक-विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सक्रीय सहभाग असावा, यासाठी स्वामी विवेकानंद विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय इटखेडा येथे शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप झाले.सभेच्या अध्यक्षस्थानी देवानंद वासनिक (माहुरकुडा) होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भागवत पाटील नाकाडे, संस्थेच्या सचिव चंद्रकला शेंडे, माजी सरपंच इंद्रदास झिलपे, ज्ञानेश्वर सोनवाने, प्राचार्य विश्वनाथ डांगे उपस्थित होते. प्रारंभी देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलनाने सभेची सुरूवात करण्यत आली. सभेचा उद्देश जयप्रकाश करंजेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विषद केला. अतिथींचे स्वागत प्राचार्य विश्वनाथ डांगे, यशवंत फुंडे, जयप्रकाश मेश्राम, देवराम चांदेवार, डोंगरवार, आदे, भाकरे, आकरे, चेतन शेंडे, पुष्पा फुंडे व इतर कर्मचाऱ्यांनी केले. शैक्षणिक सत्रामध्ये शालेय अभ्यासासोबत शाळेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सहशालेय उपक्रमामध्ये विद्यार्थ्यानी हिरीरीने आपला सहभाग नोंदवावा व शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती पालकांना व्हावी, यासठी शिक्षक-पालक सभेचे अयोजन केले जाते. यावेळी शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत गरजू विद्यार्थीनींना सायकलीचे वाटप करण्यात आले. इयत्ता ५ ते ७ वी साठी सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान व इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यासाठी आम आदमी विमा योजना योजना या सोबत शालेय उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित पालकांनी चर्चेमध्ये आपला सहभाग नोंदवित विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत आपल्या शंका व व मते मांडले.याप्रसंगी शैक्षणिक सत्र २०१४-१५ साठी शिक्षक-पालक संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्ष प्राचार्य विश्वनाथ डांगे, उपाध्यक्ष देवानंद वासनिक, सचिव जयप्रकाश करंजेकर, सहसचिव दुर्गा कुंभरे, सदस्य ईश्वर डोर्लीकर व शंकर धांडे हे विद्यार्थीे प्रतिनिधी म्हणून घोषीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मोतीलाल शेंडे यांनी तर आभार प्रा. खुशाल पेशने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)