शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ मेसेज येताच व्हा सावधान ! (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

गोंदिया: सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडण्याचे प्रकार समोर येत आहे. आता तर सीम कार्ड व्हेरिफिकेशनच्या नावाखाली संदेश ...

गोंदिया: सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडण्याचे प्रकार समोर येत आहे. आता तर सीम कार्ड व्हेरिफिकेशनच्या नावाखाली संदेश पाठवून आर्थिक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यापासून नागरिकांनी जागृत राहण्याचा सल्ला जिल्हा पोलिसांकडून दिला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून या काळात फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. याबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. सायबर कायद्यानुसार हा गुन्हा असून सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, अशी बाब सातत्याने आवाहनाच्या रूपाने करण्यात येते. फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर, सोशल मीडियासह मोबाईल कंपन्यांची नावे घेऊन फसवणूक करीत असल्याचे प्रकार वाढले आहेत. ‘सीम कार्ड खराब झाले आहे, ब्लॉक झाले आहे, ते आपण बदलून घ्यावे आपल्याला आलेला ओटीपी आम्हाला पाठवावा,’ असा संदेश पाठवून दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा, असे म्हटले जाते. यासंदर्भात एखाद्या ग्राहकाने संपर्क साधल्यास त्याला लवकरच फसविले जाते. सीम व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सन २०१९ ते २०२१ या कालावधीत सदर प्रकार जास्त प्रमाणात घडले आहेत. यासंदर्भात नागरिकांनी जागृत राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

............................

ॲप डाऊनलोड करताना जरा जपूनच

सद्यस्थितीत विविध प्रकारचे ॲप आले आहेत. याची माहिती अनेकांच्या मोबाईलवर संदेश रुपाने येत असते. त्यातच हा ॲप डाऊनलोड करताना फोन कॉल्स, मीडिया गॅलरी, यासह तुमचा मोबाईलमधील डेटा प्राप्त करण्याची परवानगीही मागितली जाते. परिणामी ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधानता बाळगावी असे तज्ज्ञांचे मत आहे.

........................

असा कॉल व मेसेज आल्यास

१) एखाद वेळेस भ्रमणध्वनीवरून पासवर्ड किंवा ओटीपी विचारला जातो, मात्र तेव्हाही कुठलाही प्रतिसाद ग्राहकाने किंवा नागरिकांनी देऊ नये.

२) सीम व्हेरिफिकेशन किंवा अन्य सोशल मीडियाच्या बाबत माहिती देत संदेश आला तर त्याला निगलेक्ट करणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्याला कुठलाही प्रतिसाद देऊ नये, परिणामी फसवणुकीची शक्यताही शून्य असते.

३) कधीही कुठलीही बँक किंवा शासकीय कार्यालयामार्फत पासवर्ड किंवा आयडी क्रमांक मागत नाही. अशा वेळी सतर्कता बाळगून कुठलीही माहिती देऊ नये, यातून फसवणूक होत नाही.

............................................

अशी घ्या काळजी

सोशल मीडिया किंवा फोनवरून आलेल्या संदेशाला मोबाईलमधून डिलीट करून टाकावा. कधीही प्रतिसाद देऊ नये यामुळे आपण फसवणुकीपासून वाचू शकतो.

.............................

कोट

एखादवेळी आपल्या आधार क्रमांकाच्या आधारे ही अकाऊंट हॅक करून फसवणूक केली जाते. फेसबुक अकाऊंट या माध्यमातून हा प्रकार सातत्याने घडत आहे. त्यामुळे आपला ओटीपी पासवर्ड कोणालाही शेअर करू नका म्हणजे आपली फसवणूक होणार नाही.

- तेजस्विनी कदम, सायबर सेल प्रमुख गोंदिया.