शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रोखरहित व्यवहार सामान्यांच्या हिताचे

By admin | Updated: January 1, 2017 01:49 IST

दैनंदिन व्यवहारामध्ये पारदर्शितपणा व्हावा, सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक होऊ नये, वेळेची बचत तसेच सहजरित्या

 एसडीओ पर्डीकर यांचे आवाहन : रोखरहित व्यवहारांचे प्रशिक्षण बोंडगावदेवी : दैनंदिन व्यवहारामध्ये पारदर्शितपणा व्हावा, सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक होऊ नये, वेळेची बचत तसेच सहजरित्या परस्पर आर्थिक व्यवहार सुलभ होण्यासाठी रोखरहित व्यवहार फायदेशीर ठरतो. कॅशलेस व्यवहाराच्या पद्धतीने शासनासोबतच सामान्य जनतेलाही फायदा मिळणार आहे. बँकेमध्ये जाण्याचा वेळ खर्ची न घालता घर बसल्या रोखरहित व्यवहार करण्यासाठी समस्त जनतेने नि:संकोचपणे पुढे येण्याचे आवाहन प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल पर्डीकर यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये कॅशलेस व्यवहारासंदर्भात आयोजित रोखरहित व्यवहारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत तालुक्यातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तालुक्यातील विविध दुकानात सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्यासाठी गाव पातळीवरील नागरिकांमध्ये जनजागृती मार्गदर्शन करुन रोखरहित व्यवहारांचे प्रशिक्षण देण्यासंबंधी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सडक-अर्जुनीचे तहसीलदार तथा अर्जुनी मोरगावचे प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल पर्डीकर, अर्जुनी मोरगावचे तहसीलदार डी.सी. बोंबार्डे, ठाणेदार नामदेव बंडगर, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. तालुक्यातील शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, स्वस्त धान्य दुकानदार, रोजगार सेवक, पोलीस पाटील, वनविभागाचे कर्मचारी यांना रोखरहित व्यवहारासंबंधी प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी पर्डीकर यांनी, अगदी सहज व साध्या पद्धतीने रोखरहित व्यवहार घरी बसून करता येतो. कॅशलेस पद्धतीने अर्थव्यवस्थेत पैसा कमी येणार. बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. एटीएम कार्डचा वापर करा. सर्वांना हिताचा ठरणारा कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सामान्य जनतेनी पुढे यावे. त्यांनी कॅशलेस व्यवहार करण्याची पद्धत भ्रमणध्वनीद्वारे प्रत्यक्षात प्रात्यक्षिकाद्वारे करुन दाखविले. तर तहसीलदार बोंबार्डे यांनी, प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गावात जावून प्रत्येक कुटुंबाला रोख रहित व्यवहार कशाप्रकारे सामन्य जनतेला हितावह आहे हे पटवून देण्याचे आवाहन केले. ठाणेदार बंडगर, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, बँक व्यवस्थापकांनी सुद्धा कॅशलेस व्यवहारासंबंधी मार्गदर्शन केले.(वार्ताहर)