शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइनवर जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

गोंदिया : आजघडीला सोशल मीडियावर तरुण मंडळी सक्रिय झाली आहे. आता ॲरेंज मॅरेज होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे ...

गोंदिया : आजघडीला सोशल मीडियावर तरुण मंडळी सक्रिय झाली आहे. आता ॲरेंज मॅरेज होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे ॲरेंज मॅरेजमुळे थाटलेला संसार सुखी आणि समाधानी होत असतो; परंतु प्रेमप्रकरणातून सुरू केलेला संसार किंवा ऑनलाइनमधून झालेल्या मित्रतेला सुखी संसारात वळविण्याचा प्रयत्न केला तरी तो बहुधा अपयशी ठरतो. ऑनलाइनमुळे जाेडीदार शोधताना मुलगा किंवा मुलगी ही पैसा, पद, प्रतिष्ठा पाहून जुळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पैसा पाहून जवळ येणारी व्यक्ती आपल्याला फसवून पळून जाईल हे खरे आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, टिव्टरवर दोस्ती करून त्यातून सुखी संसाराचे स्वप्न कुणी पाहात असेल तर ती व्यक्ती स्वत:ला खड्डयात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे असेच म्हणावे लागेल.

......................

ही घ्या काळजी

- ऑनलाइनवर जोडीदार शोधताना त्या व्यक्तीला आपण ओळखतो किंवा नाही याची खात्री करा.

- ज्या व्यक्तीशी मैत्री करतो ती व्यक्ती आपल्या संसारात आपल्याला साथ देईल किंवा नाही याची खात्री करावी.

- मित्रता करताना आपला व्यवसाय, नोकरी किंवा आपल्याला किती मिळकत आहे याची शहानिशा करणारा जोडीदार आपल्याशी प्रामाणिक राहू शकत नाही.

- दोस्ती केल्यावर पैशाचा हव्यास असलेली व्यक्ती आपल्यावर प्रेम करणार नाही तर ती आपल्या पैशावर प्रेम करते, त्यांचा स्वार्थ सिद्ध झाल्यास आपल्याला दूर करतील.

.....................

अशी होऊ शकते फसवणूक

१) ऑनलाइन आपल्याशी जवळील साधून मित्रता करतील. हळूहळू लग्नाच्या गोष्टी सुरू होतील. समोरच्या व्यक्तीच्या काय आवडी-निवडी करीत सरळ आपला स्वार्थ साधण्यासाठी श्रीमंत तरुणांच्या नादी लागून त्यांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचा यशस्वी प्रयत्न करतात.

.....

२) आपल्या मिळकतीवरून आपल्याशी कुणी लग्न करण्याच्या गोष्टी करीत असेल तर सावध व्हा. ती व्यक्ती आपल्याला पाहून नाही तर आपला पैसा पाहून जवळ येत आहे. तो आपली कधीही फसवणूक करेल. यासाठी आपण सतर्क राहा.

.........................

कोट

ऑनलाइन जोडीदार शोधताना काळजी घ्यावी. कुणी व्यक्ती आपली फसवणूक तर करीत नाही ना याची शहानिशा करावी. पैशापायी आपल्यासोबत कुणी व्यक्ती जुळून आपल्यासोबत विवाहबंधन बांधण्याच्या गोष्टी करीत असेल तर त्याची स्वत: काळजी घ्यावी, अन्यथा तो आपली फसवणूक करू शकतो.

- वैशाली पाटील, सायबर सेल प्रमुख गोंदिया.