शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! आता निष्काळजीपणा नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST

कोरोनाने पुन्हा एकदा आपला उद्रेक सुरू केला आहे. विशेष म्हणजे, देशात कोरोना शिरल्यापासूनच राज्यात सर्वाधिक कहर केला आहे. तोच प्रकार सध्या पुन्हा एकदा बघावयास मिळत आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे, विदर्भात कोरोनाने नको तेवढा कहर केला असून याला नागरिकांचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामुळेच केंद्रीय समितीने विदर्भाला सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानुसार, आता त्याचे परिणाम दिसून येत आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे स्थिती होत आहे गंभीर : नियमांचे पालनच आहे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  अवघ्या राज्यातीलच परिस्थिती आता दिवसेंदिवस गंभीर चालली असून कित्येक जिल्ह्यांत लॉकडाऊनची पाळी आली आहे. तर, जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून ही धोक्याची सूचना आहे. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर काही दिवसांनी जिल्ह्यात त्याचे पडसाद दिसून येत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सावधान होण्याची गरज असून आता निष्काळजीपणा परवडणारा ठरणार नाही. कोरोनाने पुन्हा एकदा आपला उद्रेक सुरू केला आहे. विशेष म्हणजे, देशात कोरोना शिरल्यापासूनच राज्यात सर्वाधिक कहर केला आहे. तोच प्रकार सध्या पुन्हा एकदा बघावयास मिळत आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे, विदर्भात कोरोनाने नको तेवढा कहर केला असून याला नागरिकांचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामुळेच केंद्रीय समितीने विदर्भाला सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानुसार, आता त्याचे परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाचा उद्रेक आता नागपूरपर्यंत आला असून सोमवारपासून नागपूरमध्ये लॉकडाऊन केले जाणार आहे. तर, आता जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जिल्ह्यात उद्रेक होताे, असे आरोग्य विभागाच्या अभ्यासात बघावयास मिळाले आहे. म्हणजेच, आता नागपूरमध्ये कोरोना तांडव करीत असतानाच जिल्हावासीयांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्या प्रकारे नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे व तेथे लॉकडाऊन केले जाणार. त्याप्रकारे जिल्ह्यात आतापासूनच नागरिकांनी खबरदारी घेतल्यास कोरोनाला परतावून लावता येणार आहे. मात्र, यासाठी आता नागरिकांनीx गाफील न राहता उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची खरी गरज आहे. लॉकडाऊन टाळण्यासाठी नियमांचे पालन करा नियंत्रणात असलेला कोरोना आपले रूप पुन्हा एकदा दाखवून देत आहे. नागपूर व त्यापुढे कोरोनाने तांडव सुरू केले असून कित्येकांचा जीव जात असून हजारोंच्या संख्येत बाधित वाढत आहेत. उपाययोजनांकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षाचे हे परिणाम आता जाणवू लागले असून कित्येक जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. मात्र, जिल्ह्याला आता लॉकडाऊन परवडणारे नसून लॉकडाऊन टाळायचे असल्यास नियमांचे पालन करणे हाच एकमेव उपाय आहे. यामुळेच आता जिल्हावासीयांनी कोरोना विषयक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनानेही आवश्यक त्या उपाययोजना आतापासूनच राब‌विण्याची गरज आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या