शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

बार्टीचे उपकेंद्र चालना देणार

By admin | Updated: September 17, 2015 02:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे अर्थात बार्टीने उपकेंद्र गोंदिया येथे सुरु करणार ....

पालकमंत्री बडोले यांचे प्रतिपादन : सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे अर्थात बार्टीने उपकेंद्र गोंदिया येथे सुरु करणार असल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय घटकातील उमेदवारांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच स्वावलंबी करण्यात येईल. त्यामुळे निश्चितच विकासास चालना मिळेल असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. गोंदिया येथील मरारटोली भागातील नगर परिषद शाळेच्या परिसरात नागरी दलित सुधार योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर, भाजपा शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय, नंदकुमार बिसेन, नगरसेवक शोभा चौधरी, जितेंद्र पंचबुध्दे, राहुल यादव, महेंद्र उके, शिव शर्मा, प्रतिष्ठीत नागरिक उमराव गडपायले, भाऊराव उके, हरी चौधरी व प्रदिपसिंह ठाकुर उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गोंदिया नगर परिषदेला १७ कोटी रुपये देण्यात आल्याचे पालकमंत्री बडोले यांनी सांगितले. गोंदिया शहरातील रमाई घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. उर्वरित घरकुलांचे कामे वेगाने सुरू आहे. गोंदिया नगर पालिकेला केंद्र सरकारच्या अमृत योजनेचा लाभ देण्यात येईल. त्यामुळे विकासाच्या बाबतीत गोंदियाचा कायापालट झाल्याचे दिसून येईल असेही म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेली लंडन येथील वास्तु खरेदीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. १२ वर्षापासून प्रलंबित असलेला इंदू मिलच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात गोंदिया येथे राजस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्राप्त १ कोटी ५६ लक्ष रुपयांच्या निधीतून हे सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना याचा उपयोग होणार आहे. प्रास्ताविक नगरसेवक घनश्याम पानतावणे यांनी, संचालन जयंत शुक्ला यांनी तर आभार नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ यांनी मानले. यावेळी मरारटोली परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)