शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीला पालिकेची खीळ

By admin | Updated: September 29, 2015 03:14 IST

गोंदिया नगर परिषदेकडून दरवर्षी शहरातील संपत्तीधारकांच्या संपत्तीवर किती कर लावण्यात आला याबाबतच्या

गोंदिया : गोंदिया नगर परिषदेकडून दरवर्षी शहरातील संपत्तीधारकांच्या संपत्तीवर किती कर लावण्यात आला याबाबतच्या नोटीस दिल्या जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून सदर नोटीसच देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नगर परिषदेला किती कर द्यावयाचा आहे, हेच संपत्तीधारकांना ठाऊक नाही. तब्बल ९ कोटींपेक्षा जास्त कर थकबाकी वसूल करायची असताना पालिका प्रशासन साधी नोटीस बजावण्याकडेही दुर्लक्ष करीत असल्यामुळे या उदासीनतेमागे नेमका काय हेतू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नगर परिषदेच्या कर वसुली विभागाकडून दरवर्षी प्रत्येक संपत्तीधारकाला त्याच्या संपत्तीवर किती कर लावला जातो याची माहिती नोटीसच्या माध्यमाने दिली जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून अशी कोणतीही नोटीस शहरातील नागरिकांना नगर परिषदेकडून देण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नागरिकांवर कराच्या रूपात ९ कोटी ६३ लाख ४१ हजार ९९२ रूपये बाकी आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी गोंदिया नगर परिषदेच्या कर विभागाजवळ केवळ १२ कर्मचारी आहेत. मात्र गोंदिया शहरात ४० वॉर्ड आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला वसुलीसाठी दोन वार्ड देण्यात आले आहेत. आधी एक कर्मचारी एकाच वॉर्डात वसुली करीत होता. अशात कर्मचाऱ्यांचे काम वाढले आहे. त्याचा सरळ प्रभाव वसुलीवर पडत आहे.नगर परिषदेच्या कर विभागासाठी नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात न आल्यामुळे कमी कर्मचाऱ्यांना अधिक काम करावे लागत आहे. संपत्ती कर जमा न होण्याच्या स्थितीत याचा प्रभाव शहरातील विकासावरसुद्धा पडत आहे. नगर परिषदेची कर वसुली विशेष अभियानाच्या माध्यमातूनच केली जाते. परंतु विशेष अभियानात अनेक समस्या असतात. मुख्याधिकाऱ्यांना घरोघरी जावे लागते. मागील मुख्याधिकारी सुमंत मोरे यांचे काम या बाबतीत गेल्यावर्षी उल्लेखनिय ठरले. त्यांना काही व्यापाऱ्यांचा रोषही पत्करावा लागला. पण त्यांनी वसुली केली. आता नवीन मुख्याधिकारी कर वसुलीचीही विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवितात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असणार आहे. (शहर प्रतिनिधी)किती झाली वसुली?सन २०१५-१६ मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत ८७ लाख ९५ हजार ६०९ रूपयांची कर वसुली नगर परिषदेने केली. एप्रिल महिन्यात १६ लाख ६७५ रूपये, मे महिन्यात १६ लाख ४२ हजार २२९ रूपये, जून महिन्यात १५ लाख ५४ हजार ५९६ रूपये, जुलै महिन्यात १५ लाख ५४ हजार ५९६ रूपये व आॅगस्ट महिन्यात १८ लाख ९१ हजार १५९ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. वसुलीची हीच गती राहिली तर मोठ्या कठिणतेने दोन कोटी रूपयांची वसुली संपूर्ण वर्षभरात होवू शकेल. परंतु नगर परिषदेला कमीत कमी तीन ते चार कोटी रूपयांची वसुली करणे आवश्यक आहे.म्हणे नोटीस बनविणे सुरू आहे...!या संदर्भात कर वसुली विभागाला विचारणा केली असता, नोटीस बनविण्याचे काम सुरू आहे, असे उत्तर दिले जाते. शहरातील नागरिक सांगतात की, मागील एक-दीड वर्षापासून ते जेव्हा-जेव्हा कर वसुली विभागाशी संपर्क करतात तेव्हा -तेव्हा त्यांना नोटीस बनविण्याचे काम सुरू आहे, असेच सांगितले जाते. सदर प्रतिनिधीने जेव्हा कर विभागात चौकशी केली तेव्हासुद्धा हेच सांगण्यात आले. त्यामुळे या बाबतीत सदर विभाग किती गंभीर आहे आणि पालिका प्रशासनाचे त्यावर किती नियंत्रण आहे हे दिसून येत आहे.किती झाली वसुली?सन २०१५-१६ मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत ८७ लाख ९५ हजार ६०९ रूपयांची कर वसुली नगर परिषदेने केली. एप्रिल महिन्यात १६ लाख ६७५ रूपये, मे महिन्यात १६ लाख ४२ हजार २२९ रूपये, जून महिन्यात १५ लाख ५४ हजार ५९६ रूपये, जुलै महिन्यात १५ लाख ५४ हजार ५९६ रूपये व आॅगस्ट महिन्यात १८ लाख ९१ हजार १५९ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. वसुलीची हीच गती राहिली तर मोठ्या कठिणतेने दोन कोटी रूपयांची वसुली संपूर्ण वर्षभरात होवू शकेल. परंतु नगर परिषदेला कमीत कमी तीन ते चार कोटी रूपयांची वसुली करणे आवश्यक आहे.म्हणे नोटीस बनविणे सुरू आहे...!या संदर्भात कर वसुली विभागाला विचारणा केली असता, नोटीस बनविण्याचे काम सुरू आहे, असे उत्तर दिले जाते. शहरातील नागरिक सांगतात की, मागील एक-दीड वर्षापासून ते जेव्हा-जेव्हा कर वसुली विभागाशी संपर्क करतात तेव्हा -तेव्हा त्यांना नोटीस बनविण्याचे काम सुरू आहे, असेच सांगितले जाते. सदर प्रतिनिधीने जेव्हा कर विभागात चौकशी केली तेव्हासुद्धा हेच सांगण्यात आले. त्यामुळे या बाबतीत सदर विभाग किती गंभीर आहे आणि पालिका प्रशासनाचे त्यावर किती नियंत्रण आहे हे दिसून येत आहे.