शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बालाघाट-गोंदिया रेल्वेची टॅÑक्टरला धडक

By admin | Updated: May 24, 2014 00:00 IST

गोंदिया-बालाघाट मार्गावरील गर्रा शिवारातील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरून जाणार्‍या टॅÑक्टरला गोंदिया-बालाघाट रेल्वेगाडीने जबर धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर जवळपास २०० मीटर दूरपर्यंत फेकला

 एक ठार, दुसरा जखमी : मध्य प्रदेशातील रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात

गोंदिया : गोंदिया-बालाघाट मार्गावरील गर्रा शिवारातील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरून जाणार्‍या टॅÑक्टरला गोंदिया-बालाघाट रेल्वेगाडीने जबर धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर जवळपास २०० मीटर दूरपर्यंत फेकला आणि एका मजुराचा मृत्यू झाला. यात इतर एक जण गंभीर जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार, गोंदिया-बालाघाट रेल्वे मार्गावर गर्रा स्टेशन परिसरात मानवरहित रेल्वे क्रॉसिंगजवळ कटंगीवरून गोंदियाकडे रेल्वेगाडी (७८८०४) येत होते. यादरम्यान मानवरहित फाटकाजवळ रेल्वे रूळ ओलांडणार्‍या ट्रॅक्टरला रेल्वेने जबर धडक दिली. या अपघातात शैलेश शंकरराव दमाहे (१७) याचा मृत्यू झाला व घनश्याम मानिकराम सवालाखे (३९) जखमी झाला. त्यांना उपचारासाठी बालाघाट येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. सूरज व घनश्याम हे बालाघाट जिल्ह्याच्या सूरजाटोला व बपेरा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही ट्रॉलीत रेती भरण्याचे काम करीत होते. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच गोंदियावरून मदतकार्य करणारे गाडी तत्काळ रवाना करण्यात आली. त्यात वरिष्ठ चिकित्सक डॉ.मंडल कैरिज, फोरमन अंसारी यांच्यासह ५० पेक्षा अधिक रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. नागपूर मंडळाचे मंडळ परिचालन व्यवस्थापक शर्मा, मुख्य सूरक्षा अधिकारी अनुप सत्पथी, मुख्य मंडळ अभियंता आर.के. सिंह, मुख्य सिंग्नल व दूरसंचार अभियंता रंजीतकुमार, मुख्य विद्युत अभियंता सुब्बाराव आदी घटनास्थळी पोहचले. विशेष म्हणजे अपघाताच्या काही तासांपूर्वीच बिलासपूर मुख्यालयातून मुख्य सूरक्षा अधिकारी व इतर झोनल अधिकार्‍यांचे दल आपल्या नियमित भेटीसाठी गोंदियात आले होते. (जिल्हा प्रतिनिधी)