शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

३७ उमेदवारांवर अपात्रतेच्या कारवाईचा बडगा?

By admin | Updated: May 30, 2016 01:36 IST

तालुक्यातील २०१५ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वात्रिक निवडणुका घेण्यात आल्या. सदर निवडणुकीत निवडून आलेल्या ...

राज्य निवडणूक आयोग : सदस्य म्हणून राहण्यास व निवडणूक लढविण्यास अपात्रअमरचंद ठवरे अर्जुनी मोरगावतालुक्यातील २०१५ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वात्रिक निवडणुका घेण्यात आल्या. सदर निवडणुकीत निवडून आलेल्या व निवडणुकीत उभे राहिलेल्या काही उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यात कसूर केल्याप्रकरणी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जि.प. क्षेत्राचे विद्यमान सदस्य किशोर चिंतामण तरोणे, बोंडगावदेवी जि.प. क्षेत्रामधून विजयी झालेल्या कमल प्रमोद पाऊलझगडे, भिवखिडकी पं.स. क्षेत्रामधून निवडून आलेल्या नाजूक नत्थू कुंभरे यांच्यासह निवडणूक लढविणाऱ्या ३७ उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. सदर बाब महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र असाधारण भाग एक अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल २२, २०१६ च्या पान नंबर १२ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१५. तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ३० जून २०१५ रोजी घेण्यात आली. मतमोजणी ६ जुलै २०१५ ला झाली. निवडणूक विभाग व निर्वाचक गणाचे निवडणुका लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी भरलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक खर्चाचा हिशोब निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करण्याचे लेखी शपथपत्र सादर केले होते, असे राजपत्र असाधारण पत्रामध्ये नमूद केले आहे. जि.प. व पं.स. अधिनियम १९६१ मधील कलम ६२- अ नुसार विहीत मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सक्षम अधिकाऱ्यांकडे सादर न करण्याच्या कारणास्तव ‘निरर्ह’ ठरविण्याची तरतूद असून संदर्भ (२) अन्वये याकरिता जिल्हाधिकारी हे सक्षम अधिकारी असल्याचे त्यात नमूद आहे. निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्यामुळे होणाऱ्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने २१ मार्च २०१६ रोजी एका सूचनापत्राद्वारे संबंधितांना कळविण्यात आले होते.त्याची दखल न घेता निवडणूक खर्चाचा हिशोब सक्षम अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यास झालेल्या कसुरीसाठी आपणाकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नाही, असे समजण्यास वाव आहे. ही बाब प्रकर्षाने शासन राजपत्र असाधारणमध्ये नमूद केली आहे. अशा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये व आवश्यक केलेल्या रितीने निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यास कसूर केला आहे.अशा कसुरीसाठी आपणाकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नाही, याची खात्री पटल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ६२ अ अन्वये १६ एप्रिल २०१६ च्या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह घोषित करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी काढण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. सदर कारवाई झालेल्यांमध्ये गोठणगाव जि.प. क्षेत्रातील शैलेंद्र रामचंद्र भांडारकर, नवेगावबांध जि.प. क्षेत्रामधून विजयी झालेले किशोर चिंतामन तरोणे, देवराव नेवारे बोंडगावदेवी जि.प. क्षेत्रामधून भाजपाकडून निवडून आलेल्या कमल प्रमोद पाऊलझगडे, प्राजक्ता भेंडारकर, माहुरकुडा जि.प. क्षेत्रातील खुशाल नाकाडे, महेंद्र तिरपुडे, शामकांत नेवारे, अजय बडोले, महागाव क्षेत्रातील सुधीरकुमार टेकाम, जागेश्वर भोंगारे, केशोरी भारती दहीकर, मनिषा नाकाडे तर झाशीनगर पं.स. क्षेत्रामधील बाबुराव काटेंगे, पतीराम भोंगारे, संजय लांबकाने, नवेगावबांध क्षेत्रातील निलकंठ कुंभरे, विकास नाहामूर्ते, भिवखिडकीमधून विजयी झालेल्या नाजूक नत्थू कुंभरे, स्रेहलता वळगाये, बोंडगावदेवी क्षेत्रातील नलिनी श्यामकांत नेवारे, लता मेंढे, सविता राखडे, निमगाव मोरेश्वर रहेले, बाराभाटी क्षेत्रातील होमिना बन्सोड, माहुरकुडा क्षेत्राील भाऊराव खोब्रागडे, रुपचंद खोब्रागडे, ताडगाव क्षेत्रातील लिला चर्जे, इटखेडा प्रतिभा खुणे, अरुणनगर भगवान नाकाडे, भैया नाकाडे, सुशीला मल्लीक, महागाव क्षेत्रातील शिवराम बोरकर, केशोरी वनिता कापगते, भरनोली पं.स. क्षेत्रातील सुभाष गायकवाड, तेजराम झोळे यांचा समावेश आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सदस्य व एक पंचायत समिती सदस्यांसह ३७ उमेदवारांवर कारवाईचा बडगा आला आहे. अपात्रतेची कारवाई झालेले जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्याशी संपर्क साधला असता, सदर आदेशाच्या विरोधात आयुक्ताकडे अपिल करण्यात आल्याचे सांगून न्यायासाठी न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे भ्रमणध्वनीवरुन त्यांनी सांगितले. हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.