शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

बेडकाला मृगधारेची प्रतीक्षा

By admin | Updated: June 17, 2016 02:04 IST

यंदा पाऊस सरासरीपेक्षाही जास्त पडणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते.

मृग जातोय कोरडा : हवामान खात्याचा अंदाज ठरला फोलविजय मानकर सालेकसायंदा पाऊस सरासरीपेक्षाही जास्त पडणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. एवढेच नाही तर दरवर्षीच्या पावसाच्या आगमनाच्या एक आठवडा आधी मान्सून भारतात येऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कामाची लगबग वाढविली होती, पण ती सर्व कामे आटोपलो, मृग लागून दहा दिवस लोटले तरी मृगधारा बरसल्या नाहीत. यामुळे शेतकरी वर्गाचा हिरमोड होताना दिसत आहे. यंदा मृग नक्षत्राच्या पावसाचे वाहन बेडूक आहे आणि बेडूक हा भरपूर पावसाचे प्रतिक असतो, असे मानले जाते. परंतु बेडून पावसाची वाट बघताना मृग नक्षत्र ओसरत चालले आहे. तरीसुध्दा पावसाची दमदारपणे हजेरी लागण्याची शक्यता दिसत नाही.शेतकरी वर्ग हा पावसाच्या नक्षत्रांना गृहीत धरून आपली शेतीची कामे आणि वेळेचे नियोजन करीत असतो. नियोजनाप्रमाणे सर्व शेतकरी साधारत: अक्षय तृतीयेपासून आपल्या शेतीच्या चिंतेत लागतो. यात शेतखत टाकणे, बियाणे टाकण्यासाठी जातीची वाणाची निवड करणे, शेतीची साफ सफाई करणे पार धुरे व्यवस्थीत करणे यासह अनेक छोटी-मोठी कामे करतो याचबरोबर शेतीची औजारे, नांगर, वखर, दतार, बैल, रेडे आदी सर्व आवश्यक साधनासह स्वत:ला सुसज्ज करीत असतो. साधारणत: दरवर्षी २४ मे ला रोहीणी नक्षत्र सुरू होते. तेव्हापासून पेरणी पूर्व मशागत करण्याला सुरूवात केली जाते. एकीकडे नवतपा जोरात असला तरी शेतकरी रखरखत्या उन्हात आपल्या कामाला अविरत सुरूवात करतो. दरवर्षी ७ किंवा ८ जूनला मृग नक्षत्र लागताच पेरणीला सुरूवात केली जाते. ज्या शेतात आधीच नांगरणी केलेली असते. त्या शेतात पेरणीची कामे सोयीस्कर असतात. परंतु नांगरणी नसलेल्या शेतात पावसाची वाट बघावी लागते. पावसाळ्याच्या कालावधी लक्षात घेतला तर दरवर्षी मान्सून हा १ जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर येऊन धडक देतो. त्यानंतर दहा-बारा दिवसात १० ते १२ जूनपर्यंत देशाच्या इतर भागात हजेरी लावतो. विदर्भात सुध्दा १२ ते १६ जूनपर्यंत एक पाऊस दमदार हजेरी लावून टाकतो. त्यापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस सुध्दा धडक देऊन जातो. हे कालमान मृग नक्षत्राच्या मधले कालमान असून मान्सूनची आगमनाची वेळ आणि शेतकऱ्यांचा मृग नक्षाचा अंदाज एकमेकाला समन्वय साधणारा ठरतो. परंतु मागील काही वर्षात हे समन्वय व संतुलन बिघडताना दिसून येत आहे. वैज्ञानिक आधारावर माहिती देणारे हवामान खाते सुध्दा खात्रीपूर्वक माहिती देण्यात अपयशी ठरत आहे. मागील आठवड्यात मान्सून केरळात दाखल झाला. तो ही सरासरी चार-पाच दिवस उशीरा, परंतु नंतर लगेच त्याचा जोर ओसरला. आतापर्यंत अरबी समुद्रात मान्सूनची धडक न दिल्याने महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सून केव्हा दाखल होईल हे खात्रीपूर्वक सांगणे कठीण झाले आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस काही प्रमाणात पडला तर सौभाग्य समजावा अन्यथा मृग नक्षत्राचा वाहन बेडून आतुरतेने वाट पाहत असून पाऊस येतात आपला टर टर ऐकविण्यासाठी सज्ज आहे. त्याची प्रतीक्षा केव्हा संपेल हे सांगता येत नाही.