शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीत गैरसोय टाळा

By admin | Updated: June 5, 2015 01:55 IST

जिल्ह्यातील शेतकरी खरीप आणि रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतो.

पालकमंत्र्यांचे निर्देश : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावागोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी खरीप आणि रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतो. धान उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धानाची खरेदी करताना शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊन आवश्यक त्या ठिकाणी धान खरेदी केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राबाबतचा आढावा १ जून रोजी पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, आ. विजय रहांगडाले, माजी आ. डॉ. खुशाल बोपचे, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती प्रकाश गहाणे, महिला व बाल कल्याण समितीचे सभापती सविता पुराम, कृषी समिती सभापती मोरेश्वर कटरे, जि.प. सदस्य कल्याणी कटरे, राजेश चतूर, उमाकांत ढेंगे, दीपक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना शेतकऱ्यांमध्ये गैरसमज होणार नाही, तसेच त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे. ज्या संस्था केंद्र सुरू करण्यास इच्छुक नसतील तेथे शेजारच्या तालुक्यातील संस्थांकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे. धान भरडाई केंद्राच्या तक्रारी येणार नाही याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष द्यावे, असे पालकमंत्री बडोले म्हणाले.आढावा सभेला जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी गणेश खर्चे, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय अहेर यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)