शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

यादव चौकातील दाम्पत्याचा खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:02 IST

गोंदिया : रस्त्याने जोरजोराने गाणे म्हणत जाणाऱ्या इसमावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्लात मध्यस्तीसाठी त्या तरुणाची पत्नी आली ...

गोंदिया : रस्त्याने जोरजोराने गाणे म्हणत जाणाऱ्या इसमावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्लात मध्यस्तीसाठी त्या तरुणाची पत्नी आली असता तिलाही मारहाण करण्यात आली. ही घटना ३० ऑगस्टच्या सायंकाळी ७ वाजता गोंदियाच्या यादव चौकात घडली. ईश्वर ऊर्फ शेरा हिरालाल चौधरी (३१) हा जोरजोराने गाणे म्हणत आपल्या घरी जात असताना आरोपी शुभम दीपक मोरे (२९), लीला दीपक मोरे (५२) व अनिषा दीपक मोरे (१९), तिन्ही रा. झोपडी मोहल्ला, यादव चौक, गोंदिया यांनी जोराने का ओरडतो म्हणून काठ्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या ईश्वरच्या मदतीसाठी त्याची पती आली असता तिलाही मारहाण करण्यात आली. या तिन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, ३२४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ईश्वर ऊर्फ शेरा हिरालाल चौधरी (३१) हा तलवार घेऊन शुभमच्या घरात घुसला होता. ईश्वरविरुद्ध सुद्धा गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

......................

बोर्ड ठेवण्यावरून दुकानदाराची शिवीगाळ

गोंदिया : नागपुरे मेडिकलजवळील दुकानदार श्यामलाल आत्माराम संगतानी (६३), रा. फुलचूर यांच्या दुकानासमोर ३० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या दुकानाच्या शेजारच्या दुकानदाराने आपल्या दुकानाचा बोर्ड त्यांच्या दुकानासमोर मांडला. यावरून दोघात झालेल्या शाब्दिक चकमकीत शिवीगाळ केली. आरोपी कन्हैयालाल चांदवानी (५४), रा. सिंधी कॉलनी, गोंदिया यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

....................

वडील व पत्नीला शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकेपार येथील अविनाश नारामन कोल्हे (३४) हा आरोपी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता आपल्या पत्नीला शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी देत असताना सुनेच्या मदतीसाठी धावून आलेल्या नारामण धाडोजी कोल्हो (६२) यांना आरोपी मुलगा अविनाश याने शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.....................

घर खरेदी करणाऱ्याने दिली ठार करण्याची धमकी

गोनदिया : गौतमनगरच्या मदिना मस्जीदजवळ राहणाऱ्या बबिता विष्णू पटले (२६) यांच्याकडून आरोपी विनोद नैनुमल नागदेव याने सन २०१९ मध्ये अडीच लाख रुपयांत घर खरेदी केले होते. तुम्हाला दोन लाख रुपये जास्तीचे दिले ते आता परत कर म्हणून ३० ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता त्यांना शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

....................

सट्टापट्टी घेणाऱ्यावर गुन्हा दाखल

गोंदिया : शहराच्या भाजीबाजारात ३० ऑगस्टच्या दुपारी १ वाजता आरोपी क्रिष्णा शंकर वाढवे (५३), रा. रेल्वे चौकीजवळ, रामनगर, गोंदिया हा सट्टापट्टी घेत असताना त्याच्याकडून ३५५ रुपये व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस शिपाई शीतल भांडारकर यांनी केली आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

..............