शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

By admin | Updated: August 26, 2015 01:39 IST

मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या एका तरुणीला दोन तरुणांनी दुचाकीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरुणीने समयसूचकतेने दुचाकीवरून उडी घेतली.

सिनेस्टाईल प्रकार : मोहाडी पोलिसांनी दोन तरुणांना पकडले, तरुणीने दाखविली समयसूचकता, दुचाकी जप्ततुमसर : मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या एका तरुणीला दोन तरुणांनी दुचाकीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरुणीने समयसूचकतेने दुचाकीवरून उडी घेतली. त्यानंतर आश्रयासाठी लपण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणांनी तिला शोधून दुचाकीने घेऊन जात होते. दरम्यान रात्री गस्तीवर असलेल्या मोहाडी पोलिसांनी त्यांना अडविल्यानंतर तरुणीच्या अपहरणाचा डाव फसला.तुमसर येथील इंदिरानगरात १९ वर्षीय तरुणी आईसोबत राहते. पितृछत्र नसलेल्या ही मुलगी व तिची आई मोलमजुरीची कामे करतात. रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास रोशन चामट रा.जवाहरनगर (गोवरी) व त्याचा मित्र हे दोघे त्या तरुणीच्या घरी आले. त्यावेळी ती झोपलेली होती. झोपेतच रोशनने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून भांगात कुंकू भरले.त्यानंतर दुचाकीने तिला घेऊन गोवरी (जवाहरनगर) कडे निघाले. त्यावेळी प्रसंगावधानता राखून तिने दुचाकीवरून उडी मारली. त्यानंतर लगतच्या एका घरात आश्रयाकरिता हाक मारली. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. आवाजामुळे ती त्या तरुणांना दिसली. त्यानंतर या दोन युवकांनी दुचाकीवर बसवून तिला जवाहरनगरकडे घेऊन निघाले. दरम्यान, मोहाडी येथील चौंडेश्वरी मंदिराजवळील मार्गावर गस्तीवर असलेल्या मोहाडी पोलिसांना ते दिसले. पोलिसांनी त्या तरुणांची दुचाकी अडवली. चौकशीदरम्यान या तरुणीने पोलिसांना आपबिती सांगितली. त्यानंतर मोहाडी पोलिसांनी तुमसर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना बोलाविले. तुमसर पोलिसांनी दोन्ही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ती मुलगी व तिच्या आईचे बयाण नोंदविण्यात आले आहे. आता ही तरुणी तुमसरातील आपल्या आत्याकडे राहत आहे.रोशन चामट हा त्या तरुणीचा दूरचा नातेवाईक आहे. सन २०१४ मध्ये रोशनचा अपघात झाला होता त्यावेळी ही तरुणी आईबरोबर गोवरी येथे रोशनच्या घरी गेली होती. या दोघांचे लग्न होणार होते, परंतु या तरुणीचा लग्नाला विरोध होता, अशी माहिती तिने बयानात दिली आहे. यासंदर्भात तुमसर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता बयान घेणे सुरू असून अद्याप गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)रविवारच्या मध्यरात्री दोन तरुण एका तरुणीला दुचाकीवर बसवून जात होते. त्यांना चौंडेश्वरी मंदिराजवळ रोखण्यात आले तेव्हा मुलीने सांगितलेल्या आपबितीवरुन तुमसर पोलिसांना बोलाविण्यात आले. त्यांची चौकशी तुमसर ठाण्यात सुरू आहे.- सुभाष चौधरी,सहायक उपनिरीक्षक, मोहाडी.