शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

गोंदिया : फसवणुकीच्या प्रकरणात हव्या असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीच्या भावाने हल्ला करून धमकी दिली. याप्रकरणी ...

गोंदिया : फसवणुकीच्या प्रकरणात हव्या असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीच्या भावाने हल्ला करून धमकी दिली. याप्रकरणी दोघा भावांना पोलिसांनी अटक केली आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दीनदयाल वॉर्ड येथे बुधवारी (दि.३०) रात्री १०.३० वाजेदरम्यान ही घटना घडली.

सविस्तर असे की, आरोपी राहुल डहाट (रा. दीनदयाल वॉर्ड) याच्यावर ३ मोबाइल अपहार प्रकरणात मार्च महिन्यात फसवणुकीचा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल आहे. त्यामुळे राहुल हा पोलिसांना हवा होता. बुधवारी तो घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अरविंद रघुवंशी पथकासह त्याला अटक करण्यासाठी रात्री १०.३० वाजेदरम्यान त्याच्या घरी गेले. तेथे आरोपीचा भाऊ रजत डहाट त्याला वाचविण्यासाठी खोटे बोलू लागला व पोलीस पथकावर त्याने विटा फेकल्या, तसेच तलवार घेऊन पोलिसांना धमकी देऊ लागला. याबाबत माहिती मिळताच रामनगरचे निरीक्षक प्रमोद घोंगे घटनास्थळी गेले व पथकाने रजतला ताब्यात घेतले असता राहुल डहाटही मिळून आला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तलवार जप्त केली आहे, तर पळून जाण्यासाठी रजतने सपोनि. रघुवंशी यांच्या हाताला चावा घेतला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, २९४ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.