शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वरूणराजाच्या आगमनाने शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा

By admin | Updated: June 19, 2016 01:36 IST

आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या जिल्हावासीयांना अखेर शुक्रवारी (दि.१७) दिलासा मिळाला. सायंकाकाळी आणि रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

सालेकसात सर्वाधिक : देवरी, तिरोड्यावर अवकृपा कायमगोंदिया : आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या जिल्हावासीयांना अखेर शुक्रवारी (दि.१७) दिलासा मिळाला. सायंकाकाळी आणि रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात पडला. आठही तालुक्यांत वरुणराजाने हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी १३.७७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे शेतीची कामे वेग धरणार असल्याचेही दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळ््याने तसेच पाण्याच्या टंचाईने जिल्ह्यात कधी नव्हे ती परिस्थिती निर्माण झाली होती. ४५ डिग्रीच्यावर गेलेल्या उन्हाचा तडाखा सर्वांना होरपळून सोडणारा ठरला. यात जून महिना लागूनही पाऊस न बरसल्याने तापमान चाळीशीच्या वरच होते. त्यामुळे अंगाही लाहीलाही काही कमी झाली नव्हती. शिवाय जून अर्धा लोटूनही पाऊस बरसला नाही त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला होता. रबीने दगा दिला. त्यात आता खरिप हातून जाणार तर नाही ना, या चिंतेत ते अडकले होते. शुक्रवारी (दि.१७) वरूणदेव जिल्ह्यावर खुश झाले व त्यांनी आपली हजेरी लावली. दुपारी अचानकच पावसाने हजेरी लावून सर्वांना खूश करून टाकले. त्यानंतर रात्रीही पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या पावसाची नोंद घेण्यात आली असून या पावसामुळे सर्वांनाचा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे शेतकरी आता आपल्या कामासाठी लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शनिवारी सकाळीही शहरात पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे आता पाऊस नियमीत बरसणार असल्याचे वाटत होते. त्यानंतर मात्र दिवसभर पावसाने उघाड दिली. त्यामुळे पुन्हा उकाड्याने नागरिकांना हैरान व्हावे लागेल. अशात आता तरी बरसत राहा अशी प्रार्थना केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)