शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात उभी होतेय बेरोजगारांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

गोंदिया : जिल्ह्याचा दर्जा मिळाला. अनेक विकासकामेही झाली. मात्र उद्योग-व्यवसायांच्या बाबतीत जिल्हा आजही माघारलेला आहे. अदानी वीज प्रकल्प वगळता ...

गोंदिया : जिल्ह्याचा दर्जा मिळाला. अनेक विकासकामेही झाली. मात्र उद्योग-व्यवसायांच्या बाबतीत जिल्हा आजही माघारलेला आहे. अदानी वीज प्रकल्प वगळता जिल्ह्यात अद्यापही मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे हाताला काम मिळेल अशा मोठ्या प्रकल्पाची प्रतीक्षा जिल्ह्यातील युवा वर्गाला असून, जिल्ह्यात बेरोजगारांची फौज उभी होत आहे. रोजगाराच्या नावावर लोकप्रतिनिधींकडून केवळ भूलथापा मिळत असल्याने बेरोजगार युवक आता वाममार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणारे पुढारीही सध्या बेपत्ता झाले आहेत. गोंदिया जिल्ह्याला केंद्रात तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. परंतु खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास झालेला नाही. अलीकडे विकासाच्या बोंबा होत असल्या तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न कायमच आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने हाती असलेले कामही हिरावले, त्यामुळे सुशिक्षित युवकांपासून सर्वसामान्य मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे. परिणामी, दिवसेंदिवस जिल्ह्यात बेरोजगारांची फौज तयार होत आहे.

कोरोनाचाही फटका

जिल्ह्यात अदानीशिवाय दुसरे कुठलेही मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षितांना जिल्ह्यातून पलायन करूनच रोजगार उपलब्ध करणे भाग पडते. तर दुसरीकडे शेती व्यवसायाशिवाय रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य मजुरांची नेहमीच रोजगारासाठी भटकंती होत असते. उन्हाळा व हिवाळा या दोन सत्रांत जिल्ह्यातील मजूरवर्ग रोजगाराच्या शोधात परजिल्ह्यात जात असताे. मात्र, यावरही कोरोनामुळे संकट आले आहे.

मग जिल्हा विकसित कसा?

गोंदिया जिल्ह्यात वर्ष २०१५-१६, २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली. या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा देशपातळीवर पहिल्या १० क्रमांकांत राहिला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याला केंद्र शासनाकडून गौरवान्वितही करण्यात आले. परंतु, मनरेगा योजनेत गोंदिया जिल्हा रोजगाराच्या समस्येपासून होरपळत आहे हे उघड करून दिले. यावरून गोंदिया जिल्हा विकसित कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

औद्योगिक क्रांतीची प्रतीक्षा

जिल्ह्यात मुख्यत: भातपीक घेतले जाते. त्यातही खरीप हंगामावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी अवलंबून आहेत. यामुळे जिल्ह्यात मुख्य व्यवसाय शेती आहे. परंतु, यापलीकडे जिल्ह्यात रोजगाराच्या संदर्भात कसलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिक औद्योगिक क्रांतीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात सद्य:स्थिती

गोंदिया जिल्ह्यात आजघडीला वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार १३ लाख २३ हजार ६३५ एवढी लोकसंख्या आहे. जिल्ह्यात ३ लाखांच्या जवळपास कुटुंब संख्या आहे. शिक्षितांची टक्केवारी जवळपास ८५ टक्के आहे, गोंदिया जिल्ह्यात व्याप्ती ५२३४ वर्ग किमी आहे. जनसंख्येची घनता प्रतिकिलोमीटर २५६ आहे. त्या तुलनेत रोजगार नाहीच्या प्रमाणात आहे.