शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी मोरगाव काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी पत्रयुध्द

By admin | Updated: August 17, 2014 23:16 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पत्र आणा व अध्यक्षपदी विराजमान व्हा, असा प्रकार येथे सुरू आहे. अशा पत्रांना घेऊन येथे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पत्र आणा व अध्यक्षपदी विराजमान व्हा, असा प्रकार येथे सुरू आहे. अशा पत्रांना घेऊन येथे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचे भिजत घोंगडे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मागील काळात नितीन पुगलिया यांची या पदावर वर्णी लागली होती. त्यावेळी अनेक नावांची सभेत शिफारस झाली होती. मात्र एकमेकांचे पाय ओढण्याच्या पध्दतीचा लाभ पुगलिया यांना मिळाला व ते अध्यक्षपदी विराजमान झाले. त्याच्या अपघातानंतर वर्षभरापासून हे पद रिक्त होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पत्र क्र. २८७८ दि.२७ जून २०१४ नुसार प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे शामकांत विठ्ठलराव नेवारे यांची अर्जुनी/मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र सरचिटणीस अ‍ॅड.गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. या नियुक्तीपत्राची एक प्रत आ.रामरतन राऊत यांना देण्यात आले. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पत्र क्र. ३१८२ दि. ३१ जुलै २०१४ रोजी जारी केले. यात प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार शामकांत नेवारे यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली. याऐवजी भागवत महादेव नाकाडे हे तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्षपदी कार्यरत राहतील असे पत्र सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी काढले. महिनाभरात दोघांच्या अध्यक्षपदांचे पत्र हा येथे चर्चेचा विषय आहे. एखादा सेलचे (शाखा) पत्र मुंबईवरून आणायचे आणि इकडे प्रसिध्दी माध्यमात आपल्या नावापुढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य अशी बिरूदावली लावण्याचा प्रकार येथे सुरू आहे. अशा परिस्थीतीत कुणीही अध्यक्ष असला तरी शक्ती प्रदर्शन होऊन गटबाजी होणे स्वाभाविक असल्याचे कार्यकर्ते सांगतात. (तालुका प्रतिनिधी)