शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

४९.५८ लाखांंच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: May 28, 2016 01:52 IST

जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळावी या अनुषंगाने ना. राजकुमार बडोले यांनी खनिकर्म विभागाशी पाठपुरावा केला.

विकास कामे : बडोले व अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यशगोंदिया : जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळावी या अनुषंगाने ना. राजकुमार बडोले यांनी खनिकर्म विभागाशी पाठपुरावा केला. दरम्यान उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाने महाराष्ट्र खनिज विकास निधीअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पाच रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. या कामांसाठी ४९.५८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळणार असल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी दिली आहे.जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्त्यांचा सिंहाचा वाटा राहणार आहे. ही बाब लक्षात घेवून पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील रस्ता बांधकामांना पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. या अनुषंगाने विविध विभागातून रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली. यानुरूप खनिकर्म विभागाशी पाठपुरावा केला. दरम्यान खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता यांची ना. बडोले व विनोद अग्रवाल यांनी भेट घेतली. खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील प्रस्तावित २० किमीच्या पाच रस्त्यांना मंजुरी दिली आहे. एकंदरित ४९.५८ लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. सर्व मंजूर रस्ते गोंदिया तालुक्यातील असून जिरूटोला ते नदीघाट रस्ता खडीकरण ९.९९ लाख, सतोना, हिवरा ते ढाकणी रस्ता खडीकरण ९.९९ लाख, धामनगाव ते नाला घाट रस्ता खडीकरण १० लाख, हिवरा ते ढाकणी रस्ता खडीकरण १० लाख व कामठा येथे सिमेंट रस्ता १० लाख या कामांचा समावेश आहे.