शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शेंड्यातील दारू दुकानाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: May 22, 2016 01:37 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे परवानाधारक देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान अनधिकृत बांधकाम करुन स्थानांतरीत करण्याचा खटाटोप सुरू आहे.

अनाधिकृत बांधकाम : पं.स. सदस्य व महिलांचा आरोपशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे परवानाधारक देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान अनधिकृत बांधकाम करुन स्थानांतरीत करण्याचा खटाटोप सुरू आहे. त्याला परवानगी देण्यात येवू नये, अशा आशयाचे निवेदन पं.स. सदस्य गीता टेंभरे व महिलांनी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.सविस्तर असे की, या गावात सन २००८ पासून परवानाधारक देशी दारु दुकान रवि मेरुगवार यांच्या घरी होते. परवानाधारकाने सदर दुकान चालविण्याचा नोकरनामा मेरुगवार यांच्या नावे केला होता. परवाना धारकाचे निधन झाल्यामुळे सदर परवाना पत्नी इंदू लिचडे यांच्या नावाने वर्ग करण्यात आला. परवानाधारक व मेरुगवार यांच्यात बिनसल्यामुळे दुकानाचे दस्तावेज आपल्या ताब्यात घेवून दुकान चालवण्याची तयारी केली. परंतु रवि मेरुगवार यांनी घर देण्यास नकार देवून जेसीबीने ते घर पाडले. त्यामुळे १ एप्रिलपासून देशी दारुचे दुकान बंद आहे. सध्या गावातील गट क्र. १८१, सार्वजनिक चराईकरिता मुकरर ५.४७ हेक्टर (सरकारी) ग्रामपंचायत ताब्यातील जमीन असल्याचा सातबारा तक्रारकर्त्यांने निवेदनासोबत जोडला आहे. यावरून त्या जागेवरील बांधकाम अनधिकृत आहे हे सिद्ध होते.त्याचप्रमाणे महाराष्ट्र देशी दारु नियम १९७३ नियम २५ (५) नुसार दुकान स्थानांतरीत करण्यासाठी अधिकृत जागा असावी, अथवा सक्षम स्थानिक प्राधिकाऱ्याचा दाखला असावा. तसे काही नसताना उत्पादन शुल्क विभागातील काही कर्मचाऱ्यांशी संगणमत करुन देशी दारू दुकान स्थानांतरीत करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला परवानगी देण्यात येवू नये, असे पं.स. सदस्य गीता टेंभरे व महिलांनी स्वाक्षऱ्यानिशी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना लेखी निवेदनातून सादर केले आहे. (वार्ताहर)