शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात बनणार आणखी एक उड्डाणपूल

By admin | Updated: May 22, 2014 23:58 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळेच शहरात आणखी एक उड्डाणपूल तयार होत आहे. यासाठी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत ३५ कोटींच्या

हड्डीटोली परिसर : रस्ते निधींतर्गत ३५ कोटी मंज़ूर

गोंदिया : शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळेच शहरात आणखी एक उड्डाणपूल तयार होत आहे. यासाठी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत ३५ कोटींच्या निधीस मंजूरीसुद्धा मिळाली आहे. गोंदिया शहरात गेल्या काही वर्षांपासून रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. बालाघाट मार्गावरील वसंतनगरजवळून या बांधकामाच्या कार्यास सुरूवात होवून स्थानिक तहसील कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्याजवळ आता हे काम समाप्त झाले आहे. मात्र या उड्डाणपुलाचे लोकार्पण अजुनही झालेले नाही. यामुळेच शहरातील नागरिकांना उड्डाणपुलाच्या बांधकामानंतरही ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. याचदरम्यान आणखी शहरात आणखी एका उड्डाणपुलाच्या बांधकामास शासनाने मंजूरी दिल्याची बातमी येऊन धडकली आहे. या उड्डाण पुलाच्या बांधकामाच्या मंजूरीसाठी बर्‍याच आधी प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला २८ मार्च २०१३ रोजी मंजूर केले, त्यासाठी ३५ कोटी रूपये खर्च करण्याच्या तरतुदीस मंजूरी दिली आहे. ही रक्कम केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. या उड्डाण पुलाचे बांधकाम जून २०१४ मध्ये सुरू होण्याची शक्यता बांधकाम विभागाच्या वतीने व्यक्त केली जात आहे. हा उड्डाणपूल शहराच्या हड्डीटोली परिसरात होणार आहे. तिरोडा मार्ग ते बालाघाट मार्गास जोडण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी एक रस्ता तयार करण्यात आला आहे. याला शहरातील नागरिक रिंगरोड म्हणतात. या गोंदिया-बालाघाट मार्गापासून मरारटोलीकडून एका बायपास रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या रस्त्यावर हड्डीटोली ते सिव्हील लाईन-छोटा गोंदियाला जोडण्यासाठी हे उड्डाणपूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, या उड्डाण पुलाची लांबी १०८ मीटरची राहणार आहे. उड्डाणपुलाचे १८-१८ मीटरचे चार गाळे बनविण्यात येतील. दोन्हीकडे दोन-दोन गाळे राहतील. उड्डाणपुलाच्या मध्यभागी ३० मीटरचा एक गाळा राहील. अशाप्रकारे उड्डाणपुलात पाच गाळे बनविले जातील. याशिवाय उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस अ‍ॅप्रोच मार्ग तयार केले जातील. जून २०१४ मध्ये या उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करण्याची योजना आहे. परंतु पावसाळा बघता या कालावधीत हे काम सुरू होवू शकेल का, याबद्दल शंका व्यक्त होत आहे. निविदा प्रक्रिया आताही होवू शकली नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे गोंदिया शहराची सुरक्षा लक्षात घेवून पूर्वी बायपासचे बांधकाम केले जात आहे. या अंतर्गत गोंदिया-बालाघाट मार्गापासून ते गोंदिया-आमगाव मार्गाला व गोंदिया-नागपूर मार्गाला जोडण्याचे काम सुरू आहे. परंतु यात सर्वात मोठी अडचण म्हणजे रेल्वे क्रॉसिंगवरून उड्डाणपुलास मंजूरी न मिळाल्याने होत होती. उड्डाण पुलाच्या मंजूरीने आता या बांधकामात येणार्‍या सर्व समस्या दूर होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)