शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अजून ६४२ मिमी पावसाची गरज

By admin | Updated: August 26, 2015 01:35 IST

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ७०७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आतापर्यंत ७०७ मिमी : एक महिन्यात वार्षिक सरासरी गाठणे अशक्यगोंदिया : दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ७०७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २५ आॅगस्टपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ७० टक्केच असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत जेमतेम ५२ टक्केच आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या शिल्लक राहिलेल्या अवघ्या एक महिन्यात ६४२ मिमी पाऊस पडणे जवळजवळ अशक्यच आहे. अशा परिस्थिती यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच रबीच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात रोवणी जवळपास ९६ टक्के आटोपली आहे. त्यामुळे रोवलेल्या धानपिकाच्या कोवळ्या रोपांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी आभाळाकडे नजरा लावून पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. वार्षिक सरासरीच्या अंदाजानुसार आतापर्यंत (दि.२५ आॅगस्ट) जिल्ह्यात १००९.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत ३०१.८ मिमी पाऊस कमी पडला आहे.सर्वसाधारणपणे पावसाच्या चार महिन्यात, म्हणजे १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १३४९.६१ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मात्र पावसाळ्याचा आता केवळ एक महिना शिल्लक असताना ७०७.४ मिमी पाऊस पडल्याने अपेक्षेएवढा पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत नाही. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी असून आर्थिक नुकसान सहन करण्याची पाळी येऊ शकते.पावसाच्या चार महिन्यातील तालुकानिहाय प्रमाण पाहता गोंदिया तालुक्यात सप्टेंबर अखेरपर्यंत १२१७.३० मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असताना आतापर्यंत केवळ ६४४.१ मिमी पाऊस पडला आहे. तिरोडा तालुक्यात ११३७ मिमी पावसाची अपेक्षा असताना ६४२.१ मिमी, गोरेगाव तालुक्यात १४१८.८२ मिमीऐवजी आतापर्यंत ७७५.८ मिमी पाऊस झाला. आमगाव येथे १४१८.८२ मिमीऐवजी आतापर्यंत केवळ अर्धाच म्हणजे ७४२ मिमी पाऊस पडला आहे. देवरी तालुक्यात १३५७.८० मिमीच्या तुलनेत केवळ ६०६.७ मिमी, सालेकसा तालुक्यात १४१८.८२ मिमीच्या तुलनेत ७८६.३ मिमी, सडक-अर्जुनी तालुक्यात १४००.९२ मिमीच्या तुलनेत आतापर्यंत ८३०.४ मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४२७.४० मिमी पडतो. मात्र आतापर्यंत ६७ टक्के म्हणजे ७३१.४ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. (प्रतिनिधी)