शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अजून ५० किलोमीटर रस्त्याचे खोदकाम बाकी

By admin | Updated: May 20, 2014 23:46 IST

गोंदियावासीयांना २४ तास पाणी पुरवठा करणारी शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना दिलेल्या कालावधीत पूर्णत्वास गेलीच नाही. त्यामुळे ही योजना फसल्याचे चित्र दिसत आहे.

गोंदिया : गोंदियावासीयांना २४ तास पाणी पुरवठा करणारी शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना दिलेल्या कालावधीत पूर्णत्वास गेलीच नाही. त्यामुळे ही योजना फसल्याचे चित्र दिसत आहे. नोव्हेबर २०१३ मध्येच या योजनेला पूर्ण करावयाचे होते. मात्र अद्याप योजना पूर्ण झालेली नसून आणखी सहा महिने तरी ही योजना पूर्णत्वास येणार नसल्याचे दिसत नाही. अजून ५० किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम बाकी आहे. त्यासाठी शहरातील अनेक रस्ते खोदले जाणार आहेत. यामुळे दोन महिन्यात ही योजना पूर्णत्वास जाईल, असा दावा किती खोटा आहे हे स्पष्ट होत आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शहरातील पाण्याची समस्या सुटावी यासाठी शासनाने सुमारे ८० कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना गोंदियाला भेट दिली. सन २००९ मध्ये या योजनेला सुरूवात झाली असून पहिल्या टप्यात डांगोर्ली ते कुडवा दरम्यानच्या मुख्य पाईपलाईनचे काम व पाणी टाकीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सन २०११ मध्ये शहरात पाईप लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरातील प्रत्येक रस्त्यांवर योजनेची पाईपलाईन टाकावयाची असून हे एकूण २३४ किलोमीटर अंतर असणार आहे. यात काही निर्जन भागांचा समावेश आहे. त्याला वगळल्यास सुमारे २०० किमी रस्ते खोदून त्यात पाईप लाईन टाकावयाची आहे. मात्र अद्यापही हे काम सुरूच आहे. यातील सुमारे ५० किमी. रस्त्यावर पाईपलाईन टाकणे सध्या शिल्लक आहे. वास्तविक पाहता निविदेत नमुद केल्यानुसार नोव्हेंबर २०१३ मध्येच ही योजना पूर्ण करायची होती. मात्र आतापर्यंत या योजनेचे काम सुरूच असल्याने शहरवासीयांसाठी ही योजना दिवास्वप्न ठरत आहे. या योजनेचेही काहींनी राजकारण करून टाकले आहे. येत्या दोन महिन्यांत योजनेचे लोकार्पण करणार असल्याचे आश्वासन देत आहे. मात्र योजनेची आजची स्थिती बघितल्यास आणखी सहा महिने तरी या योजनेची पूर्तता होणार नसल्याचे स्पष्ट दिसून येते. (शहर प्रतिनिधी)