सालेकसा : नगर पंचायत सालेकसा येथे मागील आरक्षणामध्ये काही किरकोळ बदल करण्यात आला असून पुन्हा नव्याने प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. प्रवर्गानुसार आरक्षीत जागाची संख्या तेवढी असून प्रभाग संख्या सुद्धा तेवढीच आहे. मात्र प्रभाग क्र.३, ११ आणि १३ मध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे. यात प्रभाग क्रमांक ३ मध्ये आधी नागरिकांचा मागास प्रवर्ग होता आता ती जागा अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये आधी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण होते. परंतु ती जागा ना.मा.प्र. महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्र.१३ मध्ये आधी अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. परंतु आता ती जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सर्वसाधारण करण्यात आली आहे. सुधारित आरक्षण सोडत नुसार एकूण १७ प्रभागामध्ये खालील प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात प्रभाग क्र.१ अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), प्रभाग क्र.२ अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), प्रभाग क्र.३ अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग क्र.४ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र.५ सर्व साधारण, प्रभाग क्र.६ अनुसूचित जमाती सर्वसाधारण, प्रभाग ७ अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग ८ अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्र.९ अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग क्र.१० सर्वसाधारण, प्रभाग क्र.११ नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्र. १२ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र.१३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्र.१४ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. १५ अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), प्रभाग क्र. १६ अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग क्र.१७ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).या प्रकारे आरक्षण काढण्यात आले आहे. प्रभाग क्र. ८ मध्ये एकूण लोकसंख्या २१९ असून यात अनुसूचित जातीची संख्या सर्वाधिक १०७ असून येथील प्रभागाला अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच एस.टीे.साठी आठ जागा राखीव ठेवण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
नगर पंचायतीचे सुधारित आरक्षण जाहीर
By admin | Updated: September 13, 2015 01:38 IST