शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून अंगणवाडी बंद

By admin | Updated: June 17, 2017 00:17 IST

तिरोडा तालुक्याच्या बोदा येथील अंगणवाडी इमारतीला गावच्याच एका नागरिकाने मालकी हक्क सांगून कुलूप ठोकला.

नुकसान बालकांचे : कुलूप लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा लोकमत न्यूज नेटवर्क काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बोदा येथील अंगणवाडी इमारतीला गावच्याच एका नागरिकाने मालकी हक्क सांगून कुलूप ठोकला. परिणामी महिनाभरापासून अंगणवाडी बंद आहे. या प्रकरणास तलाठी व बाल प्रकल्प अधिकारी यांचा हलगर्जीपणा जबाबदार असून त्यांनी तालुका दंडाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. तलाठी साजा-३ अंतर्गत बोदा येथे ग्रामपंचायतमार्फत २०१० ला इमारत तयार करण्यात आली होती. तलाठी जी.बी. हटवार यांनी सदर इमारत चिंतामन बघेले यांच्या खासगी जागेत असल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्या जागेतील इमारत आपलीच आहे, असे समजून बघेले यांनी ८ मे २०१७ रोजी त्या इमारतीला कुलूप ठोकला. हा प्रकार तलाठी जी.बी. हटवार यांच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे बोलले जात आहे. ज्यावेळी इमारत बांधायची असते त्यावेळी जमिनीचा सातबारा, नकाशा घ्यावा लागतो. सातबारामध्ये शाळेची नोंद आहे. परंतु तलाठ्यांनी सदर जागा चिंतामन बघेले यांची सांगितल्याने जमिनीवरच नव्हे तर शासकीय इमारतीला कुलूप ठोकून गंभीर गुन्हा केला आहे. या इमारतीत अंगणवाडी-२ बसत होती. कुलूप लागल्याने आता ती बंद आहे. बघेले यांनी कुलूप लावल्याने बालकांचा तसेच पोषण आहार लाभार्थ्यांना लाभ मिळू शकला नाही. अंगणवाडी सेविका सुनिता पारधी यांनी दवनीवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी कसलीही कारवाई केली नाही. बाल विकास प्रकल्प अधिकारी काळे व तिरोडा तहसीलदार यांना सदर माहिती देण्यात आली आहे. तहसीलदार संजय रामटेके यांनी तलाठी यांच्या ११ मे २०१७ च्या प्रतिवेदनावर २६ मे २०१७ ला नायब तहसीलदार यांना पत्र देवून मालकी हक्काची व रेकार्डची तपासणी करून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता अवैधरित्या लावण्यात आलेले कुलूप काढून टाकणे आवश्यक असल्याचे सांगितले. अधिनस्त मंडळ अधिकारी आणि तलाठ्याच्या सहकार्याने बघेले यांची समज घालून तीन दिवसांत कारवाई करण्याचे आदेश देवून अहवाल मागितले. याची प्रत खंडविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली. मात्र तहसीलदारांच्या पत्रावर कोणतीच कारवाई संबंधित अधिकाऱ्यांनी केली नाही. त्यामुळे महिनाभरापासून अंगणवाडी बंद असून इतर कामेसुद्धा रखडली आहेत. आता बाल प्रकल्प अधिकारी, खंड विकास अधिकारी, तलाठी तसेच पोलीस व ग्रामपंचायत कोणती कार्यवाही करते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. दिलीप बन्सोड यांनी खडसावले माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी सभापती उषा किंदरले, उपसभापती डॉ. किशोर पारधी व इतर पदाधिकाऱ्यांसह बाल प्रकल्प कार्यालयास भेट दिली. प्रकल्प अधिकारी काळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली व आजपर्यंत कसलीही कार्यवाही केली नसल्याने प्रकल्प अधिकारी काळे यांना खडसावले. तसेच बालकांचे नुकसान होणार नाही, यासाठी तत्काळ लक्ष द्यावे, अशी समज दिली.