शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव व गोंदियाला कवडीचाही निधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:54 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अधिकाधिक मजुरांना काम उपलब्ध करुन देण्याचा दावा संबंधित विभागाकडून केला जात आहे. परंतु जिल्ह्यात सर्वात मोठी पंचायत समिती असलेल्या गोंदिया व आमगाव या दोन तालुक्यांना मनरेगाच्या निधीपासून वंचित ठेवण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देमानसिक तणावात मनरेगा कर्मचारी : सर्वात मोठ्या पं.स.कडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अधिकाधिक मजुरांना काम उपलब्ध करुन देण्याचा दावा संबंधित विभागाकडून केला जात आहे. परंतु जिल्ह्यात सर्वात मोठी पंचायत समिती असलेल्या गोंदिया व आमगाव या दोन तालुक्यांना मनरेगाच्या निधीपासून वंचित ठेवण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.जिल्ह्यात गोंदिया ही सर्वात मोठी पंचायत समिती आहे. पंचायत समितीत १०९ ग्रामपंचायतचा समावेश आहे. सर्वाधिक व्यक्तिगत शौचालय, म्हशींचे गोठे व सिंचन विहिरींचे काम ८ महिन्यात पूर्ण झाले. दिवाळीनंतर ८ मार्च ला व्यक्तिगत कामाचा निधी उपजिल्हाधिकारी (मनरेगा) व लेखापाल लॉगिनमध्ये कुशल काम आले होते. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीने सार्वजनिक कामासाठी व्यक्तिगत कामाच्या निधीतून १ कोटी रूपये दिले. यात, तिरोडा पंचायत समितीला १२ लाख, अर्जुनी-मोरगाव ४२ लाख, सालेकसा २० लाख, देवरी १५ लाख, सडक-अर्जुनी १० लाख, गोरेगाव २० लाख रूपयांचा निधी दिला. मात्र गोंदिया व आमगाव पंचायत समितीला कवडीही दिली नाही.यामुळे मनरेगाचे जे लाभार्थी आहेत ते व्याजाने पैसे घेऊन बांधकाम करीत आहेत. किंवा दागिणे गहाण ठेवून काम करीत आहेत. व्यक्तीगत कामांना सोडून सार्वजनिक कामाला निधी देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात मजुरांची संख्या अधिक आहे.जिल्ह्यात मनरेगाच्या कामांवर मोठ्या प्रमाणात मजूर अवलंबून असतात. परंतू यावर्षी उपजिल्हाधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मानसिक तणावात लोटण्याचे काम केले आहे. या तणावामुळे आमगावचे सहायक कार्यक्रम अधिकारी यांनी आपला राजीनामा दिला.या स्थितीत व्यक्तिगत कामासाठी आलेला निधी सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या कामानुसार द्यायला हवा होता. परंतु गोंदिया व आमगाव पंचायत समितीला निधीपासून वंचित ठेवण्यात आले. याकडे लक्ष देणे आवश्यक असून लक्ष दिल्यास रोहयोची कामे होऊ शकतात.८० ते ८५ लाखांचे बिल थकीतगोंदिया पंचायत समितीचे ८० ते ८५ लाख रूपये व्यक्तीगत व सार्वजनिक कामांचे कुशल बिल थकीत आहे. शासन निर्णयानुसार मजुरांना १५ दिवसांच्या आत मजुरी देणे आवश्यक आहे. परंतु दोन-तीन महिन्यांपासून मजुरांना मजुरी मिळालेली नाही.