शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अल्फा व डेंडूचा शोध सुरू

By admin | Updated: April 2, 2016 02:21 IST

केंद्र शासनाद्वारे गठित एनटीसीए (नॅशनल टायगर कंझर्वेशन एडमिनिस्ट्रेशन) द्वारे नागझिरा अभयारण्यात बेपत्ता वाघीन अल्फा व वाघ डेंडू यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

कमिटी गठित : नागझिरा अभयारण्यात दोन छाव्यांसह दिसली टी-४ वाघीणगोंदिया : केंद्र शासनाद्वारे गठित एनटीसीए (नॅशनल टायगर कंझर्वेशन एडमिनिस्ट्रेशन) द्वारे नागझिरा अभयारण्यात बेपत्ता वाघीन अल्फा व वाघ डेंडू यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. सध्या नागझिरा अभयारण्यात पर्यटकांना केवळ अल्फाची मादा संतान टी-४ आपल्या दोन छाव्यांसह दिसत आहे.केंद्र शासनाने वाघांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एनटीसीएची स्थापना केली आहे. गोंदिया जिल्ह्यात वाघांवर नजर ठेवण्यासाठी तीन सदस्यीय कमिटी गठित करण्यात आली आहे. यात सेवानिवृत्त डीएफओ अशोक खुने, वनमित्र सावन बहेकार व वनमित्र राजकुमार जोब यांचा समावेश आहे. सदर तिन्ही सदस्यांचा उद्देश्य मागील वर्षापर्यंत नागझिरा अभयारण्यात दिसणाऱ्या अल्फा वाघीन व तिच्या दोन छाव्यांचा शोधून काढणे आहे. तसेच सदर तिन्ही सदस्य नागझिरा येथील डेंडू वाघालासुद्धा शोधणार आहेत.नागझिरा अभयारण्यातील नियमित भेट देणाऱ्यांशी जेव्हा लोकमतने चर्चा केली, तेव्हा ही बाब समोर आली की, दरवर्षी नागझिरा येथे कोणतीतरी वाघीन आपल्या छाव्यांसह दिसून येते. परंतु छावे मोठे झाल्यावर ते नंतर दिसून येत नाही. वनांतील माहिती तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोठे झाल्यावर छावे आपल्या मातेला सोडून आपला वेगळा क्षेत्र निवडतात. नागझिरा येथे दिसणारे छावे मोठे झाल्यावर जवळपासच्या जंगलात दिसायला हवे. यात नागझिऱ्याचे छावे जवळपासच्या जंगलात आहेत, असे म्हटले जावू शकते. परंतु जिल्ह्यातील वन्यजीव विभागाजवळ याबाबत काही ठोस प्रमाण नाही.मागील तीन वर्षांत लहानसहान शिकारी नागझिरा अभयारण्य व न्यू नागझिरा अभयारण्यात सापडले आहेत. यातून वाघांच्या शिकारीची पुष्टी होत नाही, परंतु या बाबीला नाकारतासुद्धा येत नाही. वनक्षेत्रात लागलेले कॅमेरे व निरीक्षण यातून आतापर्यंत वाघांच्या शिकारीची पक्की माहिती नाही. मात्र एनटीसीए नागझिरा येथील अल्फा व तिचे दोन छावे तसेच डेंडूला शोधून काढतील, अशी आशा आहे. त्यासाठी सदर कमिटी आणखी काय उपाययोजना आखते, यावर बरेचकाही निर्भर आहे.पाणझळीचा ऋतू सुरू आहे. नागझिरा येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. पाण्याच्या टाक्यांजवळ व इकडेतिकडे फिरत रानगवे, हरिणांच्या विविध प्रजाती तसेच इतर वन्य प्राण्यांना पाहून पर्यटक आनंदित दिसत आहेत. गरज केवळ या बाबीची आहे की, नागझिरा अभयारण्यात वाघ-वाघीनींची संख्या वाढावी. (प्रतिनिधी)