शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण विकास हे युती शासनाचे ध्येय

By admin | Updated: February 27, 2016 02:07 IST

जनतेच्या हिताच्या विकासकामांना प्राधान्यक्रम देऊन सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास हाच युती शासनाचा ध्यास आहे.

पालकमंत्री सावंत यांचे प्रतिपादन : लाखांदूर तालुक्यात कामांचे भूमिपूजन व लोकार्पण लाखांदूर : जनतेच्या हिताच्या विकासकामांना प्राधान्यक्रम देऊन सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास हाच युती शासनाचा ध्यास आहे. गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून जनतेच्या विश्वासाला युती सरकार तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील ओपारा पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर आमदार राजेश काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, पं.स. सभापती मंगला बगमारे, नगराध्यक्षा नीलम हुमणे, नगरपंचायत उपाध्यक्ष नरेश खरकाटे, सरपंच राजू राऊत, उपसरपंच राहुल राऊत, सभापती विनायक बुरडे, जि.प. सदस्य प्रदीप बुराडे, मनोहर राऊत उपस्थित होते.यावेळी आमदार काशिवार म्हणाले, मतदारानी पहिली पसंती दिल्याने विकासकामातून ऋण फेडणार असल्याचे सांगून यापुढेही गावात विविध विकासकामे केली जातील. विधानसभा क्षेत्र विकास कामापासुन वंचित राहनार नाही. शेतकरी सर्वसामन्यांच्या अडचणी तसेच युवकाना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ.सावंत म्हणाले, पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून जनतेला रहदारीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. प्रारंभी दिघोरी (मोठी) येथे जिल्हा वार्षिक योजनेतून १४७.९७ लाख रूपये निधीतून पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक, निवासस्थानाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद सदस्या माधुरी हुकरे, पं.स. सदस्य गुलाब कापसे, सरपंच शंकर खराबे उपस्थित होते. लाखांदूर येथील राज्य पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लाखांदूर नगरपंचायत अध्यक्षा नीलम हुमणे, उपाध्यक्ष नरेश खरकाटे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री सावंत यांनी इमारत बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर संपूर्ण ताफा ग्रामीण रूग्णालयात अचानक धडकला. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. पालकमंत्र्यांनी ग्रामीण रूग्णालयातील रूग्णाची आस्थेने विचारपूस केली. प्रत्येक वार्डात जाऊन तपासणी केली. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील रंगारी यांच्या संदर्भात तक्रारी असून त्या खपवून घेण्यात येणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी डॉ. रंगारी यांना ठणकावून सांगितले. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगली सेवा देण्याची सूचना त्यांनी केली. लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळाही त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी डाक्टरांनी चांगली वैद्यकीय सेवा पुरवावी, असे आवाहन करून पूर्वी रूग्णसेवा प्रामाणिकपणे डॉक्टर करायचे मात्र आता सरकारी दवाखान्याऐवजी डॉक्टर खासगी सेवेत जात रस घेताना दिसत असल्याची खंत व्यक्त करीत शासकीय सेवेत असतांना डाक्टरांनी जनतेला आपलेसे करा व चांगले नाते जोडा असे आवाहन केले. यावेळी आमदार बाळा काशिवार यांनी विविध समस्या पालकमंत्र्यांना सोडविण्याची विनंती केली. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ता, नगर पंचायत सदस्य, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतीनिधी)