गोंदिया : शुक्रवारी मद्याच्या धुंदीत वाहन चालविणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारंजा येथील रेखलाल नेवल उईके (३५) याला शुक्रवारच्या सायंकाळी ७.१५ वाजता मोटारसायकल एम.एच.३५ जे २६३२ ला मद्याच्या धुंदीत चालवितांना फुलचूर नाका येथे अटक करण्यात आली. बोरगाव येथील प्रीतिलाल दुलीचंद ठाकुर याला सायंकाळी ६ वाजता एम.एच.३५ वाय ३०५० या वाहनाला मद्याच्या धुंदीत चालविताना अटक करण्यात आली. पिपरटोला येथील जुगलकिशोर मनिराम पटले (४०) याला ६.२० वाजता मोटार सायकल एम.एच.३१ बीजे-२००९ ला मद्याच्या धुंदीत चालविताना अटक करण्यात आली. तुमखेडा खुर्द येथील धमेंद्र दिनेश नागपुरे (३२) याला एम.पी.२२ ए-३४५१ या वाहनाला मद्याच्या धुंदीत चालविताना अटक करण्यात आली. सदर घटनेसंदर्भात आरोपींविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्यपी चार वाहन चालकांना अटक
By admin | Updated: December 20, 2015 01:38 IST