शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर युनियनने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

वनहक्क जमिनीचे पट्टे आदिवासी व अनेक वर्षांपासून राहणाऱ्यांना देण्यात यावे, महसूल जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या त्यांचा पट्टा देण्यात यावा, मनरेगाची कामे नियमित सुरू ठेवा, अकुशल मजुरांच्या कामावर ६०० रुपये मजुरी द्यावी, प्रधानमंत्री शहरी व ग्रामीण आवास योजनेची प्रलंबित किस्त देण्यात यावी, ड यादीतील लोकांना घरकुल द्यावे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या राज्यव्यापी आव्हानांतर्गत ग्रामीण, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, गैरआदिवासी, अतिक्रमणधारक, रोहयोअंतर्गत काम करणारे भूमिहीन, बेघर, विधवा, वृद्ध, घटस्फोटित, परित्यक्ता, ओंग, अनाथ यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शुक्रवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढून धरणे देण्यात आले. विविध १२ मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. वनहक्क जमिनीचे पट्टे आदिवासी व अनेक वर्षांपासून राहणाऱ्यांना देण्यात यावे, महसूल जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या त्यांचा पट्टा देण्यात यावा, मनरेगाची कामे नियमित सुरू ठेवा, अकुशल मजुरांच्या कामावर ६०० रुपये मजुरी द्यावी, प्रधानमंत्री शहरी व ग्रामीण आवास योजनेची प्रलंबित किस्त देण्यात यावी, ड यादीतील लोकांना घरकुल द्यावे. वृद्ध, निराधार, अपंगांना देण्यात येणारे अर्थसाहाय्य महिन्याकाठी ६ हजार रुपये करावे, निराधारांना मानधन नको तर त्यांच्यासाठी कायदा करा, लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढा, मनरेगा योजना मजबूत करून वर्षातून एका कुटुंबातील दोन लोकांना प्रतिव्यक्ती २०० दिवस काम व ५०० रुपये दैनिक मजुरी देण्यात यावी, प्रत्येक आठवड्याला मजुरी देण्यात यावी,  नगर परिषद व नगरपंचायतीमधील आवास योजनेच्या लाभार्थ्यांना राज्याचा कोटा दिला. परंतु, केंद्र सरकारने दीड लाख रुपये दिले नाही ते देण्यात यावे,  सर्व कार्डधारकांना ३५ किलो रेशन स्वस्त दरात देण्यात यावे, निराधारांसाठी वयोमर्यादा ६५ ऐवजी ५८ करण्यात यावी, बीपीएलची नवीन यादी तयार करण्यात यावी, महागाईवर आळा घालण्यात यावा, जमाखोरी, काळाबाजार करणाऱ्यांच्या गोदामांवर धाड घालण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा समावेश होता. आंदोलनाचे नेतृत्व हौसलाल रहांगडाले, शेखर कनोजिया, रामचंद्र पाटील, प्रल्हाद उके, चरणदास भावे, अशोक मेश्राम, पुष्पा कोसरे, सोमा राऊत, नत्थू मडावी, चैतराम दिव्यवार यांनी केले.

 

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारी