शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पोटनिवडणूक रद्द

By admin | Updated: April 2, 2016 02:12 IST

पोटनिवडणुकीला घेऊन मागील २२ मार्चपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला. मतदार दायीत घोळ झाल्याच्या कारणावरून ....

निवडणूक आयोगाचे आदेश : मतदार यादीतील घोळामुळे लागले ग्रहण गोंदिया : पोटनिवडणुकीला घेऊन मागील २२ मार्चपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला. मतदार दायीत घोळ झाल्याच्या कारणावरून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांनी त्याबाबतचा लेखी आदेश शुक्रवारी जारी केला.शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्य अनिल पांडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार होती. मात्र या पोटनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत प्रभाग क्रमांक २ मधील सुमारे २७०० मतदारांचा एक भाग प्रभाग क्रमांक १ मध्ये जुळला होता. यावर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व सभापती जितेंद्र पंचबुद्धे यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. इकडे मतदार यादीतील घोळ लक्षात घेत मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांनी कर विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले, तर दुसरीकडे मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनाही शुक्रवारी निलंबीत करण्यात आले. यासोबत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून प्रभाग क्रमांक १ ची पोटनिवडणूकही रद्द करण्यात आली आहे.विशेष म्हणजे नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्यासाठी आता अवघे आठ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सदर पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या नगरसेवकाला अवघा ६ ते ७ महिन्याचा कार्यकाळ लाभला असता. आता ही निवडणूकही रद्द झाल्यामुळे निवडणूक आयोगाकडून पुढील अधिसूचना कधी निघेल आणि त्यानंतर पोटनिवडणूक कधी होईल, आणि विजयी उमेदवाराला नगरसेवकपदी राहण्यासाठी किती कार्यकाळ लाभेल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. मतदार यादीतील घोळ दुरूस्त करून नव्याने मतदार यादी तयार करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या रद्द झालेली ही निवडणूक काही दिवसानंतर होईल की नाही, की थेट सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हा मतदार संघ रिकामाच राहणार याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. (शहर प्रतिनिधी) उमेदवारांच्या उत्साहावर विरजणपोटनिवडणुकीसाठी सध्या तरी नऊ उमेदवार रिंगणात होते. यात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शिवसेनेने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. उमेदवारांनी आपले होर्डीग लावून प्रचाराचे कामही सुरू केले होते. मात्र मधातच राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून निवडणूक रद्द करण्यात आल्याने उमेदवारांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.